१० मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार चविष्ट वॉटरमेलन मोजिटो
कडक उन्हाळ्यात शरीर हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी फळांचे सेवन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कलिंगडचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये ९० टक्के पाणी आढळून येते. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर कुठून जाऊन आल्यानंतर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी कलिंगडचे सेवन करावे. यामुळे शरीरात गारवा कायम टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वॉटरमेलन मोजिटो बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. वॉटरमेलन मोजिटो बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते. याशिवाय हॉटेलमध्ये गेल्यानंतर मोजीतोची किंमत अनेकांच्या खिशाला परवडणारी नसते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी साहित्यात आणि कमी खर्चामध्ये मोजितो बनवायचा असेल तर ही वॉटरमेलन मोजिटोची रेसिपी नक्की बनवून पहा. जाणून घेऊया वॉटरमेलन मोजिटो बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
१० मिनिटांमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीत बनवा चटपटीत कच्च्या केळीचे काप, नाेट करुन घ्या रेसिपी
डाएट करताना चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काबुली चण्याचे सॅलेड
कृती:
कलिंगड मोजितो बनवण्यासाठी सर्वप्रथम. कलिंगडची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात कलिंगड, लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने, साखर टाकून बारीक वाटून घ्या.
वाटून घेतलेले मिश्रण व्यवस्थित गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या.
काचेच्या भांड्यात बर्फाचे तुकडे टाकून कलिंगडचा रस ओता आणि वरून आवश्यकतेनुसार सोडा टाकून मिक्स करा.
सर्व्ह करताना त्यात कलिंगडचे बारीक तुकडे पिण्यासाठी मोजितो सर्व्ह करा.






