(फोटो सौजन्य – istock)
नेपाळ
जर तुम्हाला हिमालयाचं सौंदर्य, गर्द हिरवाई आणि शांत वातावरण आवडत असेल, तर नेपाळ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. काठमांडूचे प्राचीन मंदिरे, भक्तपूर आणि पाटनची सांस्कृतिक वारसा स्थळे, तसेच पोखरातील शांत तलाव…हे सर्व पाहताना तुमचा प्रवास खरोखरच खास बनतो. भारतातून बस, ट्रेन किंवा स्वस्त फ्लाइट्सने नेपाळमध्ये सहज पोहोचता येते. स्थानिक वाहतूकही खूप किफायतशीर असल्याने हा देश बजेट ट्रॅव्हलर्ससाठी परफेक्ट आहे.
श्रीलंका
भारताच्या जवळ असल्यामुळे श्रीलंकेचे पर्यटन खर्च तुलनेने कमी पडतात. कोलंबोतील आधुनिक जीवन, गॉलचा ऐतिहासिक किल्ला, नुवारा एलियातील चहाचे हिरवेगार मळे आणि स्वच्छ सुवर्ण समुद्रकिनारे—हे सर्व अनुभवताना तुमचा दिवस रंगून जातो. किनाऱ्यालगतची ट्रेन राइड, ताजं सी-फूड आणि शांत वातावरणामुळे श्रीलंका बजेटमध्ये सुंदर सुट्टीसाठी योग्य गंतव्य ठरते.
थायलंड
बँकॉकची गर्दीने भरलेली पण आकर्षक बाजारपेठ, पटायाची नाईटलाइफ आणि फुकेट-क्राबीचे अप्रतिम बीच थायलंडमध्ये तुम्हाला सर्व काही वाजवी दरांत मिळते. स्वस्त शॉपिंग, टेस्टी स्ट्रीट फूड आणि बजेट निवासामुळे भारतीय पर्यटकांची ही पहिली पसंती ठरते.
व्हिएतनाम
अलीकडे भारतीय पर्यटकांमध्ये व्हिएतनाम खूप लोकप्रिय झाला आहे. हनोईच्या जुन्या गल्ली, हो ची मिन्ह सिटीचा आधुनिक स्पर्श आणि हा लॉंग बेसारखा जगप्रसिद्ध क्रूझ अनुभव या देशाला खास बनवतो. स्थानिक खर्च भारतापेक्षा कमी असल्याने प्रवास अधिक परवडतो.
इंडोनेशिया
इंडोनेशियामध्ये बाली प्रसिद्ध असले तरी इतर अनेक बेटेही तितकीच सुंदर आहेत. पायर्यांसारखे दिसणारे भातशेतीचे नजारे, धबधबे, शांत बीच, बजेट रिसॉर्ट्स आणि स्थानिक ‘वारुंग’मध्ये मिळणारे परवडणारे खाद्य, यामुळे हा देश साहस आणि निसर्गप्रेमी दोघांसाठी आदर्श आहे.
थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ
मलेशिया
क्वालालंपूरच्या गगनचुंबी इमारती, पेट्रोनास टॉवर्स, जेंटिंग हायलँड्स आणि लंगकावीचे मनमोहक किनारे मलेशिया विविध अनुभवांनी परिपूर्ण आहे. स्वस्त फ्लाइट्स आणि किफायती अन्न-निवासामुळे हा देश आरामदायी आणि बजेट-फ्रेंडली ठरतो. योग्य वेळी बुकिंग, हलकं पॅकिंग आणि किफायतशीर निवास यामुळे हे सर्व देश तुम्हाला ४०,००० रुपयांच्या आत एका संस्मरणीय इंटरनॅशनल ट्रिपचा अनुभव देऊ शकतात.






