Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही मळलेलं पीठं फ्रिजमध्ये ठेवू शकता. परंतु पीठ भिजवल्यानंतर लगेच वापरावे, कारण त्यात अनेक रासायनिक बदल होतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ २४ तासांच्या आत वापरणे उत्तम मानले जाते. तसेच, जास्त काळ ठेवलेले पीठ वापरल्यास कालांतराने त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात. शिवाय, त्यात बॅक्टेरिया आणि विषारी घटकही वाढू शकतात.
पीठ जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने ती खाण्यायोग्य असली तरी, त्यातून कोणतेही पौष्टिक मूल्य मिळत नाही. फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ हानिकारक किरणांच्या संपर्कात येतात ज्यामुळे ते खराब होते. ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. तसेच शिळ्या पिठापासून बनवलेली चपाती खाल्ल्यास गॅस, अपचन, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय, पीठ आंबल्याने फूड पॉइजनिंगचा धोका देखील वाढतो.
जर पीठ २४ तासांपेक्षा जास्त काळ स्टोअर करुन ठेवले असेल, तर ते वापरण्यापूर्वी नेहमी तपासा. जर त्याला वास येत असेल किंवा पिठाचा रंग बदललेला दिसत असेल, तर ते अजिबात वापरू नका. नेहमी ताजे पीठ वापरण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त, तुम्ही सकाळी पीठ मळून संध्याकाळपर्यंत वापरू शकता. त्यापेक्षा जास्त काळ साठवून ठेवल्यास पीठातील न्यूट्रिशन निघून जाते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो






