Skin Care Tips Air Conditioner Side Effects On Skin
Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
AC Side Effects On Skin: सतत एसीच्या संपर्कात राहिल्याने त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्वचा हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.
उन्हाळ्यात तीव्र उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी एअर कंडिशनर (AC) ही एक गरज बनली आहे. अनेकजण घरी, कार्यालयात आणि त्यांच्या कारमध्येही एसी वापरतात. मात्र, एसीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने केवळ शरीरावरच नव्हे, तर त्वचेवरही परिणाम होऊ शकतात.एसी हवेतील आर्द्रता कमी करतो ज्यामुळे हवा कोरडी होते आणि याचा परिणाम थेट त्वचेच्या आरोग्यावर होतो. सतत एसीमध्ये राहिल्याने काही लोकांना ड्राय स्कीन, खाज येणे, स्ट्रेच मार्क्स आणि निस्तेजपणा यासारख्या समस्या जाणवतात. वेळीच योग्य काळजी न घेतल्यास, त्वचा आणखी निस्तेज होऊ शकते.
स्कीन ड्राय होते– एसी हवेतील आर्द्रता कमी करतो, ज्यामुळे त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते आणि स्कीन ड्राय होते.
त्वचेची चमक कमी होते– एअर कंडिशनरच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू शकते. विशेषतः, शरीरात पाण्याची कमतरता असेल तर चेहऱ्यावर लवकर परिणाम दिसू शकतो.
खाज आणि जळजळ वाढू शकते– कोरड्या त्वचेमुळे काही लोकांना खाज सुटणे, लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते. ज्यांची त्वचा सेंसिटिव्ह आहे त्यांना जास्त त्रास होऊ शकतो.
ओठ आणि हात ड्राय होतात– फक्त चेहऱ्याची त्वचा नाही तर, ओठ, हाथ आणि पाय यांची त्वचा देखील ड्राय होते. तसेच, एसीच्या हवेमुळे काहींचे ओठ देखील फाटतात.
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
भरपूर पाणी प्या– शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते. तुम्ही तुमच्या आहारात पाणी, नारळाचे पाणी, लिंबू सरबत आणि जास्त पाणी असलेली फळे यांचा समावेश करू शकता.
मॉइश्चरायझर लावा– त्वचा ड्राय होऊ नये यासाठी तुमच्या स्कीन टाइपनुसार योग्य मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील कोरडेपणा कमी होते आणि त्वचा हायड्रेट राहते.
फेस मिस्ट किंवा गुलाबजल वापरा– दिवसातून दोनदा फेस मिस्ट किंवा गुलाबजल लावल्याने त्वचा चमकदार होते.
गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा– गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल आणखी कमी होऊ शकते म्हणून चेहरा थंड किंवा कोमट पाण्याने धुवा.
लिप बाम लावा– जर तुमचे ओठ वारंवार ड्राय होत असतील, तर चांगल्या ब्रँडचा लिप बाम वापरणे फायदेशीर ठरू शकते.
निरोगी आहार घ्या– निरोगी त्वचेसाठी योग्य आणि हेल्दी आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारात काकडी, टरबूज, संत्री, दही आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.