Health Tips: रात्री उशिरापर्यंत जागे राहता? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, मिळेल गाढ आणि शांत झोप
चेहरा दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने स्वच्छ करा. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा मॉइश्चरइज्ड राहते आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. वय वाढल्यावर त्वचेला अधिक हायड्रेशनची गरज भासते.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व, पिग्मेंटेशन आणि सुरकुत्या वाढू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य एसपीएफ SPF असलेले सनस्क्रीन वापरणे आणि आवश्यकतेनुसार पुन्हा लावणे फायदेशीर ठरते.
हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, ड्राय फ्रुट्स, बिया आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि निरोगी फॅट्स त्वचेला आतून पोषण देऊन तिची चमक टिकवण्यास मदत करतात. तसेच दिवसभर शरीराला आवश्यक पुरेसे पाणी पिणेही तितकेच आवश्यक आहे.
रोज ७ ते ८ तासांची झोप शरीराच्या पेशींच्या रिकव्हरीसाठी महत्त्वाची असते. सततचा ताण त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे योगा, ध्यान किंवा हलका व्यायाम यांचा नियमित सराव केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणतेही स्किनकेअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या गरजा ओळखा. अति प्रमाणात प्रोडक्ट बदलणे किंवा स्ट्रॉंग केमिकल असलेले प्रोडक्ट वापरणे टाळा. साधी आणि सातत्यपूर्ण स्किनकेअर रुटीन अधिक फायदेशीर ठरते.
धूम्रपान, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन आणि पाण्याचे कमी सेवन यामुळे त्वचेचे वृद्धत्व लवकर दिसू शकते. निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण






