IUI उपाय नक्की काय आहेत आणि का अपयश येतंय (फोटो सौजन्य - iStock)
आई होणे जगातील सर्वात आनंददायी बाब. परंतु प्रिया (नाव बदलले आहे) या मातृत्वसुखापासून वंचित होती. ३१ वर्षांची प्रिया आठ वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत होती. विविध उपचार केल्यानंतर मेडिकल हिस्ट्रीनुसार तिला लॅपरोस्कोपिक ओव्हेरियन ड्रिलिंग, मायोमेक्टोमी, सहा ओव्हुलेशन इंडक्शन सायकल आणि तीन अयशस्वी आययूआय यांचा सामना करावा लागला होता. अनेक अपचार आणि प्रक्रियांनंतर तिला शारीरिक त्रास होण्यासोबत ती मानसिकरीत्या खचून गेली होती. समाजाचा सामना करणे तिला कठीण झाले होते. प्रजनन उपचार घेत असलेली अनेक जोडपी अयशस्वी ठरूनही वारंवार आययूआय सायकल सुरू राहते. कारण यातून किमान मातृत्वाची एक आशा कायम असते. पण असे का घडते असा प्रश्न आपल्याला पडतो आणि हेच कारण आपण या लेखातून पाहूया (फोटो सौजन्य – iStock)
या चक्राचे प्रमाण किती असावे?
वैद्यकीयदृष्ट्या तीन अयशस्वी आययूआय प्रयत्नांनंतर संपूर्ण पूनर्मूल्यांकनाची आवश्यकता असते. यानंतर प्रयत्न सुरू ठेवल्यास अधिक गुणकारी उपचार पर्यायांना विलंब होऊ शकतो. महिलेला पीसीओएस असेल तर वाढलेली एलएच पातळी ओव्हुलेशन बिघडू शकते किंवा अंडी खराब दर्जाची असणे हे कारण असू शकते. पुरुष जोडीदारामध्ये अनुकूल वीर्याची कमतरता गर्भधारणेवर परिणाम करू शकते. वेळेवर न केलेल्या प्रक्रिया, कमी लॅबोरेटरी क्वालिटी किंवा फायब्रॉइड्ससारखे अपरिचित अंतर्निहित गर्भाशयाची पॅथेलॉजी ही काही इतर कारणे असू शकतात.
IVF प्रक्रियेला घाबरुन जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला
पुढील उपचार काय?
कसा करावा उपाय
वारंवार आययूआय अपेक्षित परिणाम देत नसतील तर सखोल मूल्यांकन अतिशय महत्त्वाचे आहे. गर्भाशयाच्या लिनिंगचे मूल्यांकन करण्यासाठी आणि एंडोमेट्रिटिस किंवा क्षयरोगाची शक्यता दूर करण्यासाठी ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक हिस्टेरोस्कोपी करणे गरजेचे आहे. गर्भाशयाच्या राखीव जागेची तपासणी करण्यासाठी एएमएच चाचणी. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वीर्य विश्लेषण शुक्राणूंच्या गुणवत्तेसाठी डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स (डीएफआय) तपासले पाहिजे.
अनुवांशिक विसंगतीसाठी जोडप्याचे कॅरिओटाइपिंग
जर काही समस्या आढळल्या जसे अंडी खराब गुणवत्तेची किंवा जास्त डीएनए फ्रॅगमेंटेशन. जोडप्यासाठी वैयक्तिकृत प्रोटोकॉल आणि प्रगत शुक्राणू निवड तंत्रे (जसे मायक्रोफ्लुइडिक्स किंवा स्पर्म सॉर्टर) वापरून आयव्हीएफ मार्ग स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
Isha Ambani ने IVF प्रक्रियेबाबत केला खुलासा, पॅरेंटिंगबाबत मांडले मत
भावनिक, शारीरिकदृष्ट्या काय साह्यभूत ठरते?
नियमित प्रक्रियांऐवजी पुराव्यावर आधारित, धोरणात्मक काळजी घेण्याला प्राधान्य द्या. पारदर्शकता असलेले, व्यापक चाचणी देणारे आणि वैयक्तिक योजना विकसित करणारे क्लिनिक्स शोधा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्य उत्तम राखण्याला प्राधान्य द्या, कारण आशेचा किरण त्रासदायक नाही तर सक्षम करणारा असला पाहिजे.
प्रियाच्या केससंदर्भात त्यांनी आयव्हीएफ निवडला आणि हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टोमी व किमान उत्तेजना यांचा समावेश असलेल्या योग्य पूर्व-उपचार मिळाले. ज्यानंतर त्यांना पहिल्याच चक्रात गोड बातमी मिळाली. मनाने खचून जाण्यासह जेनेरिक उपचार प्रोटोकॉल्वर खर्च करण्यापेक्षा त्वरित हस्तक्षेप, वेळेवर वाढ आणि वैयक्तिक विचारांना प्राधान्य द्यावे.