(फोटो सौजन्य: Pinterest)
बॉलिवूडचा फेमस दिग्दर्शक करण जोहर अलीकडे आपला नवीन शो ‘द ट्रेटर्स’ मुळे खूप चर्चेत आहे. हा एक गेम शो आहे ज्यात बॉलिवूड आणि सोशल मीडिया इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. या शोची एक खास गोष्ट म्हणजे याचे लोकेशन. आम्ही तुम्हाला सांगतो की, जैलसलमेरच्या एका आलिशान राजवाड्यात या शोचे शूटिंग पार पडले. इथे अनेक आलिशान सोई-सुविधा आणि आहेत. या राजवाड्याचे नाव सूर्यगढ पॅलेस असे आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जर तुम्हाला शाही ट्रिप करायची असेल आणि तुमचे बजेटही भारीभक्कम असेल तर सूर्यगढ पॅलेस तुमच्यासाठीच आहे. हे ठिकाण वेडिंग डेस्टिनेशनसाठीची खूप फेमस आहे. हे भारतातील सर्वात आलिशान आणि महागड्या हॉटेल्समध्ये या पॅलेसचा समावेश होतो. इथे तुम्ही शाही गोष्टींचा अनुभव घेऊ शकता आणि तुमची ट्रिप संस्मरणीय बनवू शकता. हे ठिकाण केवळ टीव्ही शूटिंगसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठी देखील खुले आहे.
सूर्यगड पॅलेस
आपल्या भव्य वास्तुकलेमुळे सूर्यगढ पॅलेस अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. हे राजपुतानाच्या वारशाचे उत्तम प्रतिबिंब आहे. इथे प्रवेश करताच राजवाड्यातील प्राचीन भिंती तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करतील. हॉटेलच्या भिंती पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेल्या आहेत, ज्या आपल्याला जुन्या काळाच्या वैभवाची आणि इतिहासाची आठवण करून देतात. जुन्या काळातील राजेशाही आणि आधुनिक काळातील सोयीसुविधांचे मिश्रण हे खास बनवते.
पिवळ्या दगडापासून बनवलेल्या या राजवाड्यात खोल्या आणि सुइट्स तसेच ५ व्हिला आहेत. तसेच इथे जैलसलमेर हवेली आणि थोर हवेली अशा दोन हवेल्या आहेत. जैसलमेर हवेली सुमारे १२०० चौरस फूट क्षेत्रात पसरलेली आहे. सूर्यगड हॉटेलमध्ये ८४ खोल्या आणि ९२ बेडरूम आहेत. हॉटेलमध्ये बावडी नावाचे एक ठिकाण आहे, जे विशेषतः लग्नाच्या फेऱ्यांसाठी डिझाइन केलेले आहे. या बावडीमध्ये मंडपाभोवती आकर्षक खांब देखील आहेत.
एका रात्रीच भाडं इतकं
आता इथे राहण्याच्या किमतीविषयी बोलणं केलं तर, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, येथे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे १२,६०० पासून सुरू होते. तुम्ही प्रीमियम सुविधा घेतल्या तर याचं भाडं वाढत जाऊ शकत. राजवाडयच्या महागड्या खोल्या किंवा सुइट्स १ ते २ लाखांपर्यंत जातात. आता तुम्हाला वाटत असेल की इतके पैसे कशाचे… तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या खोल्यांमध्ये पॅलेस रूम्स, ग्रँड हेरिटेज रूम्स, सिग्नेचर सुइट्स, लक्झरी सुइट्स यांचा समावेश आहे.
सूर्यगडमध्ये लग्नाचा खर्च
सूर्यगड पॅलेस हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक उत्तम ठिकाण मानले जाते. बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचाही विवाहसोहळा या पॅलेसमध्ये पार पडला. येथे दोन दिवसांच्या लग्नाचा खर्च सुमारे २ कोटी ते २.५ कोटी रुपये असू शकतो, ज्यामध्ये जवळजवळ सर्व सोई-सुविधांचा समावेश असतो.
Rainbow Mountain: जगभरात आहेत 5 रंगीबेरंगी पर्वत; फार आकर्षक आहेत इथली दृश्ये
हवाई मार्ग
तुम्ही इथे विमानाने जायचा विचार करत असाल तर याच्या सर्वात जवळचे विमानतळ जैसलमेर विमानतळ आहे. तिथून सूर्यगड पॅलेसवर टॅक्सी किंवा हॉटेल कॅब सेवेने सुमारे २०-३० मिनिटांत पोहोचता येते.
रेल्वे मार्ग
जैसलमेर रेल्वे स्टेशन दिल्ली, जोधपूर, जयपूर आणि मुंबई सारख्या देशातील अनेक प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. स्टेशनपासून सूर्यगड पॅलेसपर्यंत टॅक्सी, ऑटो किंवा हॉटेल कॅब करू शकता. याने तुम्हाला सुमारे २०-२५ मिनिटे तिथे पोहचायला लागू शकतात.
रस्ता मार्ग
जैसलमेर शहरातही चांगली रस्ते कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही कार, खाजगी टॅक्सी किंवा राजस्थान रोडवेज बसने जैसलमेरला पोहोचू शकता. जैसलमेरहून सूर्यगड पॅलेसला जाण्यासाठी टॅक्सी हा सर्वोत्तम पर्याय आहे.