सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या पन्नाशीमध्ये वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागत होत्या. मात्र हल्ली कमी वयातच चेहऱ्यावर पिगमेंटेशन येणे, सुरकुत्या येणे, बारीक रेषा येणे, पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. चेहऱ्यावर बारीक रेषा किंवा सुरकुत्या आल्यानंतर सुंदरता कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा बारीक रेषा दिसू लागल्यानंतर लगेच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमची त्वचा तेजस्वी आणि सुंदर दिसेल.
सुंदर आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी शरीर हायड्रेट असणे गरजेचे आहे.निरोगी शरीर राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी ४ लिटर पाण्याचे सेवन करावे. सतत पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. पाणी प्यायल्यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा पिगमेंटेशन येत नाहीत.
हे देखील वाचा: दांडिया खेळल्यानंतर घाम येतो? मग ‘हे’ प्रॉडक्ट वापरून करा वॉटरप्रूफ मेकअपबेस
त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यासाठी मॉईश्चरायजर लावणे गरजेचे आहे. मॉईश्चरायजरचा वापर केल्यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर दिसते. तुमच्या त्वचेला सूट होईल असे आणि चांगल्या दर्जाचे मॉईश्चरायजर नेहमी त्वचेला लावावे. जेणेकरून त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यास मदत होईल.
सुरकुत्या किंवा बारीक रेषा दिसू लागल्यानंतर केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी चेहऱ्यावर कोरफड जेल किंवा फेस मसाज क्रीमचा वापर करावा. मसाज केल्यामुळे त्वचेवरील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. मसाज केल्यामुळे त्वचा फ्रेश आणि टवटवीत दिसते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फेस मसाज करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
हे देखील वाचा: चमक कमी होऊन चेहरा काळा पडत चाललाय? मग आजच आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये या रसाचा समावेश करा
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर फेसमास्क किंवा फेसपॅक लावणे गरजेचे आहे. फेसमास्क लावल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. फेसमास्क बनवण्यासाठी कॉफी, मध, हळद, बेसन किंवा इतर घरगुती पदार्थांचा तुम्ही वापर करू शकता.