जेवणात बनवा मुळ्याची चविष्ट चटणी
हिवाळ्यात बाजारात भरपूर पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्या खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या भाज्यांमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या, बीट, गाजर इत्यादी अनेक फ्रेश भाज्या उपलब्ध असतात. अनेक घरांमध्ये हिवाळ्यात फक्त पालेभाज्या बनवल्या जातात. पालेभाज्या खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अनेक घरांमध्ये मुळ्याची भाजी बनवली जाते तर काहींच्या घरी मुळ्याचे पराठे बनवले जातात. पण लहानमुलांसह मोठ्यांसुद्धा मुळ्याची भाजी खायला आवडत नाही. मुळ्याच्या भाजीला उर्ग वास येतो म्हणून अनेक घरांमध्ये मुळा आणला जात नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने मुळ्याची भाजी अतिशय पौष्टिक आणि चवदार आहे. आज आम्ही तुम्हाला मुळ्याच्या भाजीपासून जेवणात चविष्ट चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
मुळ्याची चटणी बनवण्यासाठी, सर्वप्रथम मुळा स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून किसून घ्या.
कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण पाकळ्या, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या टाकून व्यवस्थित परतून घ्या.
गॅस बंद करून सर्व मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर खलबत्यामध्ये ठेवून त्यात बारीक किसून घेतलेला मुळा आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.
नंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड, लिंबाचा रस घालून बारीक कुटून घ्या.
तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मुळ्याची चटणी.