पांढऱ्या केसांपासून मिळेल कायमची सुटका! कांद्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर
अकाली केस पांढरे का होतात?
हेअर डाय लावल्यामुळे केसांचे होणारे नुकसान?
नॅचरल हेअर डाय बनवण्याची सोपी कृती?
हल्ली तरुण वयातील मुलामुलींपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचे केस पांढरे झाले आहेत. केस पांढरे होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण तरुण वयात केस पांढरे होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. अनुवंशिकता, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, चुकीच्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. यामुळे काहीवेळा केस अकाली पांढरे होऊन जाते. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर महिला वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट, हेअर कलर, हेअर डाय इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात.हेअर डाय किंवा हेअर कलर केल्यामुळे काहीकाळापुरतेच केस सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांची चमक कमी होऊन केस पांढरे होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
पांढरे केस काळे करण्यासाठी वारंवार हेअर कलर किंवा हेअर डाय करणे धोक्याचे ठरू शकते. केमिकल प्रॉडक्टचा वारंवार वापर केल्यामुळे केसांच्या वाढीवर त्याचे परिणाम दिसून येतात. याशिवाय केसांच्या मुळांना गंभीर हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या सालींचा वापर करून नॅचरल हेअर डाय बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. महागडे हेअर डाय केसांना हानी पोहचवतात. पण नैसर्गिक पदार्थांच्या वापरामुळे केसांची गुणवत्ता कायमच व्यवस्थित टिकून राहते.हेअर डाय लावल्यामुळे पांढरे केस काळेभोर आणि सुंदर दिसतात. यामुळे केसांमधील ओलावा सुद्धा कायम टिकून राहतो.
कांद्याचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कांदा सोलल्यानंतर साल फेकून दिली जाते. मात्र असे न करता तुम्ही कांद्याच्या सालीची वापर करून हेअर डाय बनवू शकता. तेल, कॉफी पावडर, विटामिन ‘ई’ कॅप्सूलचा वापर करून तुम्ही नैसर्गिक हेअर डाय बनवू शकता. नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेला हेअर डाय महिन्यातून एकदा तुम्ही केसांवर लावू शकता.
हेअर डाय बनवण्यासाठी कढईमध्ये कांद्याची साल कुरकुरीत होईपर्यंत भाजा. साली पूर्णपणे काळ्या झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओतून बारीक पावडर तयार करा. तयार केलेली कांद्याची पावडर वाटीमध्ये काढून त्यात कॉफी पावडर, खोबरेल तेल आणि विटामिन ‘ई’ कॅप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर सर्व पदार्थ लोखंडी कढईमध्ये रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी हेअर डाय केसांना लावण्याआधी त्यात तयार केलेले चहाचे पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेला हेअर डाय संपूर्ण केसांवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. ३० ते ४० मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांचा पांढरेपणा कमी होऊन केस काळेभोर आणि सुंदर दिसतील.






