गुळाचा वापर करून झटपट बनवा मालपुआ
भारतासह सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने जेवण बनवले जाते. राजस्थान, गुजरात, मुंबई किंवा पुणे इत्यादी भागांमध्ये खाद्य संस्कृती अतिशय वेगळी आहे. जेवणाच्या ताटात काहींना नेहमीच गोड पदार्थ हवा असतो. त्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मालपुआ. गव्हाचं पीठ आणि वेलची पावडर इत्यादी अनेक पदार्थ टाकून मालपुआ बनवला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. नेहमीच गोड पदार्थ बनवताना साखरेचा वापर केला जातो. पण नेहमी नेहमी साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. साखर खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात गुळाचे पदार्थ खावेत. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मालपुआ ही पारंपरिक रेसिपी बनवली जात आहे. गावी गेल्यानंतर आजी घरातील लहान मुलांना मालपुआ बनवून देते. चला तर जाणून घेऊया मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – pinterest)
संध्याकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत पनीर ठेचा पराठा
कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख