Maharashtra Breaking News Updates Today
Maharashtra to National And International Breaking News: शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून उद्धव ठाकरेंनीच नियुक्ती केली होती, असेही सिब्बल यांनी कोर्टात सांगितले.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतरमंतरवरील आंदोलनानंतर देशभरातून पक्षाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सीजेपीची पुढची वाटचाल कशी असेल, पक्षाची रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यासाठी आज अभिजीत दिपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी सीजेपीच्या कोअर कमिटी दोन दिवसीय महत्त्वपूर्ण रणनीतिक बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातून आलेले समन्वयक व कोअर कमिटीचे सदस्य सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सीजेपीच्या आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
05 Aug 2026 07:01 PM (IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्राचा पर्यटन ( Maharashtra Tourism ) ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी, प्रभावी जनसंपर्क आणि नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव आधुनिक माध्यमांतून जगासमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
05 Aug 2026 06:40 PM (IST)
UP Crime News Marathi: उत्तर प्रदेशातील नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी उघड्या गटारात सापडलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या मृतदेहामागील गूढ पोलिसांनी अखेर उलगडले आहे. पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांमुळे नातेसंबंध, आईचे प्रेम, माणुसकी आणि विश्वास हे सर्व प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. इन्स्टाग्रामवर जुळलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या नात्याची किंमत सहा महिन्यांच्या साहिलला आपल्या प्राणांनी चुकवावी लागली. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया…
05 Aug 2026 06:34 PM (IST)
Mark Zuckerberg News: मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी प्लॅटफॉर्मवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री (CSAM), डीपफेक मजकूर आणि कामकाजातील त्रुटींबाबत माफी मागितली आहे. अहवालांनुसार, भारत सरकारने (Central Goverment) मेटाला स्पष्टपणे कळवले आहे की कंपनी ‘मध्यस्थ’ (intermediary) या व्याख्येत बसत नाही, कारण विशिष्ट मजकूर कोणाला दिसावा हे कंपनी स्वतः ठरवते; त्यामुळे, आयटी (IT) कायद्यांतर्गत मिळणारे ‘सेफ हार्बर’ (कायदेशीर संरक्षण) कवच त्यांना लागू होत नाही. मार्क झुकरबर्ग यांनी मान्य केले की विशिष्ट प्रकारच्या मजकुराचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला गेला होता आणि या चुकीबद्दल त्यांनी खेद व्यक्त करत माफी मागितली.
05 Aug 2026 06:22 PM (IST)
मुंबई: ब्रह्माकुमारीजच्या वतीने देशभर राबविण्यात येणाऱ्या '१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियान'या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या मुंबई अभियानाचा शुभारंभ आज वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (भायखळा प्राणिसंग्रहालय) येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाला. राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते.
05 Aug 2026 06:17 PM (IST)
कर्जत: पावसाळा किंवा वादळाच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. अशातच कर्जत तालुक्यातील रजपे ग्रुप ग्रामपंचायत मधील शिंगढोळ या गावातील विजेचे पुरवठा करणारे रोहित्र बंद पडले होते.त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर आपल्या गावातील रहिवाशी यांना जास्त दिवस अंधारात राहू नये यासाठी स्थानिक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका सचिव रामदास घरत यांनी धावपळ करून वीज रोहित पनवेल येथून आणले.
05 Aug 2026 05:58 PM (IST)
जागतिक दर्जाचे पर्यटन असलेल्या माथेरान मधील समस्यांबाबत येत्या महिन्याभरात सकारात्मक बदल झालेले दिसतील असा विश्वास आमदार थोरवे यांनी नगरपरिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत व्यक्त केला.तर शहराच्या विकासासाठी आणि शहराला जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी शेकडो कोटींचा निधी आणायचा आहे असे आश्वासन यावेळी दिले.
05 Aug 2026 05:48 PM (IST)
भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाला असून बुधवारी भिवंडी-निजामपूर महानगरपालिका (बीएनसीएमसी) मुख्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष परवीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते महापालिका मुख्यालयात दाखल झाले. यावेळी आंदोलकांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
05 Aug 2026 05:38 PM (IST)
विद्यार्थ्यांची आंदोलने आणि निदर्शने यांसारख्या मुद्द्यांवर टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही लोकशाही आंदोलनादरम्यान किंवा शांततापूर्ण मार्च काढताना प्रशासनाने अत्यंत संयम बाळगला पाहिजे. तरुण आंदोलक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्यास, सर्वात आधी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. हिंसाचार रोखण्यासाठी हिंसक प्रतिक्रिया देणे हा त्यावर उपाय नाही, तर त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले.
05 Aug 2026 05:25 PM (IST)
समृद्धी महामार्गावर ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकने समोरील वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा क्लिनर किरकोळ जखमी झाला. आरजे-जीडी ४४१२ क्रमांकाचा ट्रक समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २६९,४०० जवळून जात असताना चालक लेकराज (२६, रा. टेडीबगिया, ता. जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला पहाटे सुमारे ३.५३ वाजता झोपेची डुलकी लागली. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून तो समोरील वाहनावर पाठीमागून धडकला.
05 Aug 2026 05:14 PM (IST)
सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने वापरलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दप्रयोगामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील (MVA) काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही महिलेबद्दल अशी असभ्य टिप्पणी करणे पूर्णपणे चुकीचे आहे; मात्र, त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) दुटप्पीपणाचा आरोपही केला.
05 Aug 2026 04:58 PM (IST)
एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटविण्याबाबत सिब्बल यांंनी आमदारांच्या संख्याबळाची त्यासाठी आवश्यकता नसल्याचे कोर्टात सांगितले. हा अधिकार पक्षप्रमुखांचा असल्याचेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.
05 Aug 2026 04:46 PM (IST)
विधिमंडळ पक्षातील एखादा गट नेता किंवा प्रतोद बदलू शकत नाही. हा अधिकार पक्षप्रमुखांचा असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
05 Aug 2026 04:37 PM (IST)
पक्षचिन्ह राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे, हा खरा प्रश्न असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे पक्षातील बहुमतासाठी काही सुत्र आहे का, असाही प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे.
05 Aug 2026 04:26 PM (IST)
मिरा-भाईंदर शहरातील अवघ्या अडीच वर्षांच्या श्लोका निमित शाह हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर जागतिक विक्रम प्रस्थापित करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अधिकृत नोंद करण्यात आली असून तिला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
श्लोका हिने यादृच्छिक (Randomly) पद्धतीने दाखविण्यात आलेल्या इंग्रजी वर्णमालेच्या फ्लॅश कार्ड्सवरून अनेक शब्द अचूक ओळखण्याची अनोखी कामगिरी केली. या कामगिरीमुळे "यादृच्छिक पद्धतीने सादर केलेल्या इंग्रजी वर्णमालेच्या फ्लॅश कार्ड्सवरून अनेक शब्द अचूक ओळखणारी सर्वात लहान वयाची बालिका" हा विश्वविक्रम तिच्या नावावर नोंदविण्यात आला.
05 Aug 2026 04:13 PM (IST)
भिवंडीतल्या कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता शहराचं राजकारण तापलं आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बीएनसीएमसी मुख्यालयात घुसून जोरदार आंदोलन केलं. महापालिका आयुक्त कार्यालयाला कुलूप लावलं आणि काँग्रेस कार्यालयासमोरही घोषणाबाजी केली.
भिवंडीत कोहिनूर अपार्टमेंट कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली. शहर जिल्हाध्यक्ष परवीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात प्रवेश करून महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं.
प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलकांचा आरोप आहे की दुर्घटनेला 4 दिवस झाले तरी महापालिका आयुक्त सुट्टीवर आहेत आणि अजूनही भिवंडीत परतले नाहीत. कोहिनूर अपघातासाठी नगरपालिका प्रशासन, संबंधित अधिकारी, प्रभाग अधिकारी अनिल घूघरे आणि बीट निरीक्षक अमूल वारघडे यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
05 Aug 2026 04:12 PM (IST)
गुवाहाटीत असताना आमदारांनी सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत संगनमत केल्याचा दावा सिब्बल यांनी कोर्टात केला. भाजपच्या नेत्यांशी हे आमदार सतत संपर्कात होते. शिवसेनेने त्यांच्या पक्षविरोधी कारवायांबाबत निवडणूक आयोगाला कळविले होते, अशी माहितीही सिब्बल यांनी दिली.
05 Aug 2026 03:58 PM (IST)
कर्जत तालुक्यातील रजपे ग्रुप ग्रामपंचायत मधील शिंगढोळ या गावातील विजेचे पुरवठा करणारे रोहित्र बंद पडले होते.त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर आपल्या गावातील रहिवाशी यांना जास्त दिवस अंधारात राहू नये यासाठी स्थानिक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका सचिव रामदास घरत यांनी धावपळ करून वीज रोहित पनवेल येथून आणले.
70 घरांची वस्ती असलेल्या गेल्या दीड दोन महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होता.सतत सुरू असणारा पाऊस आणि नेहमी कमी जास्त होणारा विद्युत पुरवठा तसेच लाईटचा लपंडाव यामुळे शिंगढोळ गावातील विद्युत रोहित्र खराब झाला.त्याचा परिणाम शिंगढोळ गावातील पूर्ण गाव अंधारात ही बाब गावातील जागरूक स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, तथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कर्जत तालुका सचिव रामदास घरत यांनी स्थानिक रहिवाशी यांना सोबत घेऊन धावपळ सुरू केली.त्यानंतर रामदास घरत यांनी तात्काळ महावितरण वरीष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि लागलीच दुसऱ्या दिवशी तात्काळ पनवेल येथे जाऊन दुसरा विद्युत रोहित्र आणले. शिंगढोळ गावात महावितरणचे वायरमन दिलीप लोभी यांनी कर्जत येथून शिंगढोळ येथे पोहचले.
05 Aug 2026 03:42 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी)च्या रुक्मिणीबाई रुग्णालयात इंजेक्शनची सुई एका लहान मुलाच्या कमरेत अडकल्याच्या धक्कादायक प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेची दखल घेत अंबरनाथ मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर संतोष वर्मा आणि केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्याकडून चौकशी आहेत. मात्र हा इंजेक्शन एका शिकाऊ डॉक्टरांनी दिल्याचे सांगितले जात आहे परंतु इंजेक्शन देताना हॉस्पिटल मधील डॉक्टर त्या ठिकाणी असणे गरजेचे होते त्या ठिकाणी तो डॉक्टर नव्हता.
05 Aug 2026 03:32 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेतील एका अधिकाऱ्याने कार्यालयातील महत्त्वाची फाईल आपल्या घरी मागविल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित फाईल नगररचना विभागातील असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, एका व्यक्तीने कार्यालयातून ही फाईल कारमध्ये ठेवली जात असल्याचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या घटनेमुळे कार्यालयीन कामकाजाशी संबंधित महत्त्वाची फाईल कार्यालयाबाहेर का नेण्यात आली, ती घरी मागविण्याची गरज काय होती आणि संबंधित अधिकारी नेमका कोण आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
05 Aug 2026 03:26 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.मात्र, या कार्यक्रमात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. नागरिकांच्या समस्या कडे लक्ष नाही आणि सत्ताधारी शिवसेनेच्या शिबिरात केडीएमसी आयुक्त अभिनय गोयल जातात काँग्रेसने आयुक्तांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर असल्याची थेट टीका काँग्रेस गट नेत्या कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.
05 Aug 2026 03:24 PM (IST)
शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून उद्धव ठाकरेंनीच नियुक्ती केली होती, असेही सिब्बल यांनी कोर्टात सांगितले.
05 Aug 2026 03:18 PM (IST)
कोकणातील शेती संस्कृतीशी असलेले आपले नाते जपत वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती रामदास कदम यांनी आज खेड तालुक्यातील जामगे येथे शेतकरी महिलांसोबत भात लावणीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योती कदम यांनी शेतीप्रती असलेली आपली जिव्हाळ्याची भावना पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावातील शेतात आज पारंपरिक पद्धतीने भात लावणीचा उत्साह पाहायला मिळाला. वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती कदम यांनी शेतकरी महिलांसोबत खांद्याला खांदा लावून भात लावणीची कामे केली. भाताची रोपे काढण्यापासून ते प्रत्यक्ष लावणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी सहभाग घेतला.
05 Aug 2026 03:00 PM (IST)
ICMAI June 2026 Results: इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) कडून इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इन्स्टिट्यूटने जून २०२६ सत्रासाठी (टर्म) सिलॅबस २०२२ अंतर्गत झालेल्या परीक्षांचा निकाल व तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्तेची यादी (मेरिट लिस्ट) जारी केली आहे. आता यामध्ये कोणत्या शहरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या वर्षी ७,८८५ उमेदवारांनी इंटरमिजिएट कोर्स पूर्ण केला आहे, तर ४,२२० उमेदवारांनी फायनल परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मेरिट लिस्टमध्ये टॉप ५ रँक मिळवणाऱ्या उमेदवारांची नावे आणि त्यांच्या शहरांची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
05 Aug 2026 02:55 PM (IST)
गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत्या इंधन दरवाढीशी आणि जागतिक महागाईशी झुंजणाऱ्या संपूर्ण जगासाठी आज एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य पूर्वेतील तीव्र लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, इराण आणि ओमान हे तिन्ही देश अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘होर्मुझचा सागरी मार्ग’ (Strait of Hormuz)आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पुन्हा खुला करण्याच्या करारावर पोहोचले आहेत. अमेरिकन वृत्त संकेतस्थळ ‘ॲक्सिऑस’ने (Axios) दिलेल्या माहितीनुसार, या कराराची अधिकृत घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
05 Aug 2026 02:50 PM (IST)
India Vs Sri Lanka Test Series: येत्या 15 तारखेपासून भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट सिरिज सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची सिरिज होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्याच्या जागी औकीब नबीला संधी देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी मोहम्मद शामीला संधी देण्यात आली नाही. त्यावर आता त्याने भाष्य केल्याचे समोर येत आहे.
05 Aug 2026 02:45 PM (IST)
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आला होता. पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशीच तिची हत्या तिच्याच प्रियकराने केली. लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून प्रेयसीची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
05 Aug 2026 02:40 PM (IST)
IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेला रवाना झाली आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल येथे, तर दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवला जाईल. भारतीय संघ जवळपास नऊ वर्षांनंतर श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत आपला प्रभावी विक्रम कायम ठेवू शकेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
05 Aug 2026 02:35 PM (IST)
जपानमधील ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन समूहातील कंपनी असलेल्या ब्रिजस्टोन इंडियाने भारतातील आपल्या कार्याचा 30 वर्षांचा टप्पा साजरा केला. स्थापनेपासूनच आशियाई बाजारपेठेत प्रवेश करून परदेशातील व्यवसाय विस्ताराला प्राधान्य देणाऱ्या ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनने आज जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये उच्च दर्जाची उत्पादने पुरविण्याबरोबरच स्थानिक समुदायांशी निगडित व्यावसायिक उपक्रम उभारले आहेत. या निमित्ताने ब्रिजस्टोन इंडियाने नवी दिल्ली येथे प्रमुख भागधारकांच्या उपस्थितीत स्मरणोत्सवाचे आयोजन केले. कंपनीच्या विकासाच्या प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या भागीदारांचा यावेळी गौरव करण्यात आला.
05 Aug 2026 02:30 PM (IST)
कोरपना: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ते तेलंगणा सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३बी वरील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी केला. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली.
05 Aug 2026 02:20 PM (IST)
Bangladesh Vs Austrelia Test Series: येत्या 13 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. टेस्ट सिरिज सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सिरिज सुरू होण्याच्या आधीच संघाबाहेर गेला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मायकल नेसर सिरिजबाहेर गेला आहे. नेसरच्या नसण्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढू शकतात.
05 Aug 2026 02:10 PM (IST)
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने त्यांच्या MyCall मोबाईल ॲपचे अपग्रेटेड वर्जन लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेले ॲपचे हे नवीन वर्जन यूजर्सना त्यांच्या व्हॉईस कॉलच्या क्वालिटीचा फीडबॅक देण्यासाठी आणि कॉल ड्रॉप, ईको आणि ऑडियो डिले सारख्या समस्यांचा रिपोर्ट करण्याची सुविधा देणार आहे. कंपनीने ॲपचे हे नवीन वर्जन सध्या अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध केले आहे. या ॲप वर्जनद्वारे यूजर्स व्हॉईस कॉलची रेटिंग देऊ शकतात आणि नेटवर्क परफॉर्मंसची माहिती शेअर करू शकतात. यूजर्सद्वारे देण्यात आलेला हा फीडबॅक थेट टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्स आणि रेगुलेटरसोबत शेअर केला जाणार आहे
05 Aug 2026 02:05 PM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. १५ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल. कारण, टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध आपला ६०० वा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत जगात केवळ दोनच संघांनी ६०० कसोटी सामने खेळले आहेत आणि आता भारतही त्या यादीत सामील होईल. या मालिकेसाठी, भारताचे धुरंदर श्रीलंकेत दाखल झाले आहेत.
05 Aug 2026 02:00 PM (IST)
जवळपास १.५ किलो कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला अडीच वर्षांहून अधिक काळ बहुतांश सुनावण्यांच्या वेळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले नसल्याचे गंभीर प्रक्रियात्मक उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सरंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष एस. चव्हाण यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. सेंटली याच्याविरोधात थॉमस याने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात महसूल संचालनालयाने एनडीपीएस कायद्यांतर्गत आला. थॉमस गुप्तचर गुन्हा दाखल केला आहे.
05 Aug 2026 01:55 PM (IST)
महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिम सुरू आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील मतदारांची पडताळणी आणि नाव नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. घरोघरी जाऊन केली जाणारी ही पडताळणी प्रक्रिया 8 ऑगस्ट रोजी संपणार होती. पण निवडणूक आयोगाने या मोहिमेला 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. प्रशासकीय यंत्रणेवरील ताण आणि नागरिकांची गरज लक्षात घेता एसआयआर प्रक्रिया १७ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
05 Aug 2026 01:50 PM (IST)
अकोला शहरातील महत्त्वाचा आणि ब्रिटिशकालीन वारसा लाभलेला अकोट फाइल रेल्वे पूल जुना व जीर्ण झाल्याने त्याच्या जागी अत्याधुनिक नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. खासदार धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
05 Aug 2026 01:45 PM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. १५ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल. कारण, टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध आपला ६०० वा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत जगात केवळ दोनच संघांनी ६०० कसोटी सामने खेळले आहेत आणि आता भारतही त्या यादीत सामील होईल. या मालिकेसाठी, भारताचे धुरंदर श्रीलंकेत दाखल झाले आहेत.
05 Aug 2026 01:35 PM (IST)
मिरा-भाईंदर (Mira Bhayandar) शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील रखडलेल्या कामावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मौजे वरसावे येथील सर्व्हे क्रमांक ३४-ब मधील आरसीसी पुलाच्या कामाला मे. सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रा. लि. आणि त्यांचे संचालक आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
05 Aug 2026 01:30 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन सध्या त्याच्या खेळापेक्षा एका व्हायरल फोटोमुळे जास्त चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याच्या काही छायाचित्रांची जोरदार चर्चा होत आहे, ज्यामध्ये तो फॉर्मल ड्रेसमध्ये आणि गळ्यात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे आयडी कार्ड घातलेला दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की, ईशान किशन खरंच आरबीआयमध्ये नोकरी करतो का? जर होय, तर त्याला ही नोकरी कधी मिळाली, तो कोणत्या पदावर आहे, ही स्पोर्ट्स कोट्याची नोकरी आहे का आणि आरबीआयच्या असिस्टंट मॅनेजरला किती पगार मिळतो? चला सविस्तर जाणून घेऊया…
05 Aug 2026 01:25 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेल्या ‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर’ चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन शरद पवार यांनी करावे, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.
05 Aug 2026 01:15 PM (IST)
लाखो नीट इच्छुकांची प्रतीक्षा संपली असून त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने आज म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी नीट यूजी २०२६ राऊंड-१ समुपदेशनासाठी नोंदणी विंडो सुरू केली आहे. जर तुम्हालाही देशातील टॉप AIIMS, JIPMER किंवा केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि ऑल इंडिया कोटा (१५%) जागांवर MBBS-BDS सारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश हवा असेल, तर तुम्ही mcc.nic.in वर जाऊन त्वरित अर्ज करू शकता.
05 Aug 2026 01:05 PM (IST)
भारतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठीत चित्रपट प्रदर्शन कंपनी PVR INOX ने आज ‘PVR INOX स्मार्ट सिनेमा’चे अनावरण केले. ही एक नवीन संकल्पना असून कंपनीच्या वाढीच्या पुढील टप्प्याची सुरुवात आहे. खास करून भारतातील लहान शहरांसाठी डिझाइन केलेले PVR INOX स्मार्ट सिनेमा, PVR INOX चा खास अनुभव एका नाविन्यपूर्ण आणि कमी भांडवलात होणाऱ्या विस्ताराच्या मॉडेलसोबत एकत्र आणते, ज्यामुळे भारतातील वेगाने पुढे येणाऱ्या शहरांमधील प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाचा सिनेमा मिळणे अधिक सोपे होणार आहे.
05 Aug 2026 12:58 PM (IST)
मिरा-भाईंदर शहरातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रो मार्गिका क्रमांक ९ (दहिसर–मिरा-भाईंदर) च्या अंतिम टप्प्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी सुरू करण्यात आली आहे.
या अंतिम टप्प्यात ट्रॅक, वीजपुरवठा, सिग्नल यंत्रणा तसेच सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जात आहे. मेट्रोचे विविध तांत्रिक निकष आणि कार्यक्षमतेची चाचणी टप्प्याटप्प्याने पार पडत असून, सर्व प्रक्रिया नियोजनानुसार सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
05 Aug 2026 12:47 PM (IST)
आंबोली महादेवगड पॉईंट येथे काल दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा शोध घेण्याची मोहीम आज पुन्हा सकाळपासून सुरू झाली. काल दाट धुके व काळोख यामुळे हो शोध मोहीम थांबवण्यात आली होती. कर्नाटकमधील बेळगाव निपाणी येथील नऊ जणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी आंबोलीत आला होता. त्यातील आयुब सय्यद नावाचा पर्यटक ४०० फुट खोल असलेल्या दरीत कोसळला. ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले होते. मात्र, नैसर्गिक अडथळे येत होते. काल थांबवलेली शोध मोहीम आज पुन्हा सकाळी सुरू करण्यात आली आहे. मात्र, दाट धुक्क्यामुळे शोध मोहीमेला अडथळा येत आहे.
05 Aug 2026 12:35 PM (IST)
मिरा-भाईंदर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील रखडलेल्या कामावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मौजे वरसावे येथील सर्व्हे क्रमांक ३४-ब मधील आरसीसी पुलाच्या कामाला मे. सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रा. लि. आणि त्यांचे संचालक आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
05 Aug 2026 12:23 PM (IST)
पश्चिम उपनगरात घर देण्याच्या बहाण्याने क्राइम पेट्रोल फेम सतीश नायकोडे यांची जवळपास 25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय. मागील वर्षभरापासून न्यायासाठी सतीश नायकोडे पोलीस ठाण्याचे उंबरठे झीजवतायत. स्वतःसह कुटुंबावर ओढवलेली आपबीती सांगताना नायकोडे यांना अश्रू अनावर झालेत. यादरम्यान त्यांना आपल्या वडिलांना देखील गमवावं लागलं.. तर आत्महत्येचा देखील त्यांनी प्रयत्न केला..
सांताक्रुज येथे एसआरए प्रकल्पात घर मिळवून देण्याच्या अमिषापोटी नायकोडे आस्था प्रॉपर्टीज च्या संपर्कात आले. आणि यातून जवळपास त्यांच्याकडून 25 लाख रुपये उकळण्यात आले.. अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, स्टॅम्प पेपर वर लेखी स्वरूपात या सर्व बाबी झाल्याने सतीश नायकोडे यांचा विश्वास अधिक घट्ट झाला. मात्र यातून त्यांना सध्या केवळ मनस्ताप सहन करावा लागतोय. घडलेली संपूर्ण सांगताना सतीश नायकोडे यांना अश्रू अनावर होत त्यांनी न्यायाची मागणी केली..
05 Aug 2026 12:11 PM (IST)
सह्याद्रीच्या कुशीत दुर्गम भागात असलेल्या सावंतवाडीतील घारपी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नांगरणी व भाताच्या रोपांची लावणी करण्याचा अनुभव घेतला. “बांधावरची शाळा” या उपक्रमांतर्गत विद्यार्थी घारपी येथील एका शेतात पोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी भातलागवडीचे बारकावे, शेतीतील मेहनत, ऋतूचक्राशी असलेले नाते आणि अन्ननिर्मितीचा अखंड प्रवास प्रत्यक्ष अनुभवला. “एक दिवस शेतकऱ्यांसाठी...आपल्या अन्नदात्यासाठी" हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय अनुभव ठरला.
05 Aug 2026 12:01 PM (IST)
मिरा-भाईंदरमधील भाईंदर पूर्व परिसरात रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावर कथितरित्या फेविक्विक टाकून पळून जाणाऱ्या आरोपीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामनिवास मोहनलाल कुमावत (वय ३३) असे आहे.
ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली होती. दक्षा ललित पाटील (वय २५) या बाजारातून घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पाठीमागून त्यांच्या अंगावर द्रवरूप पदार्थ टाकला. त्यामुळे त्यांच्या शरीरावर जळजळ होऊ लागली. त्यानंतर त्या तात्काळ नवघर पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी भाईंदर पश्चिम येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.
05 Aug 2026 11:50 AM (IST)
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एक उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनने चार चेंडूंमध्ये तीन बळी घेत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. अवघ्या पाच मिनिटांत त्याने पाकिस्तानी फलंदाजीला ३८७ धावांवर रोखले, जी धावसंख्या एके काळी ४०० धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. असे असूनही, वेस्ट इंडिजची स्थिती आता नाजूक दिसत आहे. WI vs PAK चा पहिला कसोटी सामनादेखील चर्चेत राहिला होता. मात्र आता दुसऱ्या सामन्यावर पाकिस्तानची पकड अधिक घट्ट होताना दिसत आहे. तरीही क्रिकेट असा खेळ आहे जो कधीही कोणत्याही क्षणी पलटू शकतो.
05 Aug 2026 11:45 AM (IST)
फरिदाबादच्या सिकरोना गावात एका शिक्षेकवरुन एका नकाबपोशाने हल्ला करत शाळेच्या आवारातच तिचा खून केला. ही घटना सोमवारी सरस्वती सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये सकाळच्या सुमारास घडली. दिवसाढवळा शाळेत घुसून शिक्षिकेची हत्या केल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली असून हल्लेखोराने शिक्षिकेवर तब्बल वीस वेळा चाकूने वार केल्याची माहिती आहे. या घटनेचे फुटेज शाळेच्या सासीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
05 Aug 2026 11:30 AM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू Ishan Kishan सरकारी लिपिकाच्या वेशात पाटणा येथील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शाखेत पोहोचला. इशान किशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये तो बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. इशानने त्याचे आरबीआय ओळखपत्रही घातले आहे. इशानचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले, कारण अनेकांना माहित नव्हते की इशान किशन आरबीआयमध्ये काम करतो.






