जास्वंदी हेअरमास्क बनवण्याची कृती
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याप्रमाणे केसांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये केसांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवर खाज येणे, केस गळणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांमुळे केस खराब होण्याची शक्यता असते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकल शॅम्पूचा वापर करतात. यामुळे काहीकाळ केस सुंदर आणि चमकदार दिसतात, मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस गळती थांबवण्यासाठी केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावणे, केस स्वच्छ पाण्याने धुवणे इत्यादी गोष्टी नियमित फॉलो केल्यास केसांची गुणवत्ता खराब होत नाही.(फोटो सौजन्य-istock)
हेअरकेअर संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांच्या वाढीसाठी शरीराला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. दैनंदिन आहारात बाहेरील पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे केसांची वाढ निरोगी होते आणि केसांना कोणतीही इजा होत नाही. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा हेअर मास्क नक्की वापरून पहा.
हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, जास्वंदीची फुले स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात दही आणि इसेंशियल ऑईल टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये मध मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या.
तयार केलेला हेअर मास्क केसांच्या मुळांना सगळ्यात आधी लावून घ्या. त्यानंतर संपूर्ण केसांना लावून २५ मिनिटं ठेवा. केसांना हेअरमास्क लावल्यामुळे केसांची वाढ मजबूत होईल आणि केस सुंदर दिसतील. जास्वंदीमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी आहेत. शिवाय यामुळे केसांना योग्य ते पोषण मिळते. केसांवरील नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी जास्वंदी हेअरमास्कचा वापर करावा.
हेअरकेअर संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांच्या निरोगी वाढीसाठी हेअरमास्क लावणे आवश्यक आहे. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक ते प्रोटीन मिळते. हेअरमास्क केसांना लावल्यामुळे केस चमकदार अंबी सुंदर दिसतील. केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळेल. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. हेअरमास्क लावल्यानंतर कोणत्याही प्रकारचे इतर प्रॉडक्ट लावू नये.