(फोटो सौजन्य: Pinterest)
देवघर मंदिर (झारखंड)
झारखंडातील देवघर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगातील एक आहे. पाैराणिक कथेनुसार, रावण शंकरांच्या शिवलिंगाच्या रुपात लंकेत घेऊन जाण्याचा हट्ट करत होता. अशात शंकराने त्याच्या इच्छेचा स्वीकार तर केला पण त्यांनी एक अट ठेवली. शिवलिंगाला वाटेत जमिनीचा स्पर्श होता कामा नये, अशी ही अट होती. पण वाटेत रावणाला फसवण्यात आले आणि या शिवलिंगाची देवघर मंदिरात स्थापना झाली. यानंतर भगवान विश्वकर्मा यांनी एका रात्रीत वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम केले.
गोविंद देव जी मंदिर (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशच्या वृंदावनात वसलेले गोविंद देव जी मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिराविषयी मान्यता आहे की, याला माणासांनी नाही तर देवांनी एका रात्रीत बांधले. सांगितलं जातं की, सूर्योदयाच्या आधी मंदिर पूर्णपणे तयार झाले नाही ज्यामुळे रचना अपूर्ण राहिली.
काकनमठ मंदिर (मध्य प्रदेश)
मध्य प्रदेशच्या मुरैना येथे वसलेले काकनमठ मंदिराची कथा हैराण करणारी आहे. मंदिराच्या कथेविषयी बोलण केलं तर याविषयी सांगितलं जातं की, भगवान शिवाला समर्पित हे मंदिर माणासाने नाही तर भूतांना एका रात्रीत तयार केलं. परंतु याचीही रचना सूर्याेदयापर्यंत पूर्ण न झाल्याने मंदिर अपूर्ण राहिले. आजही लोक या मंदिरात येऊन शिवलिंगाची पूजा करतात.
भोजेश्वर मंदिर (मध्य प्रदेश)
मध्य प्रदेशच्या भोजपूरमध्ये स्थित भोजेश्वर मंदिर हे महाभारताच्या काळातील मंदिर असल्याचे मानले जाते. सांगितले जाते की, जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा स्वप्नात त्यांना भगवान शिवाचे दर्शन झाले. सकाळी पांडवांनी आपली आई कुंतीसोबत याविषयी चर्चा केली. आईच्या सल्ल्यानुसार त्यांनी त्याच ठिकाणी मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला आणि एका रात्रीत मंदिराची निर्मिती करण्यात आली.
हथिया देवाल मंदिर (उत्तराखंड)
उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये वसलेल्या या मंदिराची कहाणी देखील फार रंजक आहे. याविषयी सांगितले जाते की, एक हात असलेल्या शिल्पकाराने एका रात्रीतच एकाच दगडात या मंदिराला कोरले. मात्र अंधारामुळे त्याने शिवलिंग उलट्या दिशेला बनवले ज्यामुळे इथे शिवलिंगाची पूजा केली जात नाही.
ही सर्वच मंदिरे आपल्या अनोख्या इतिहासासाठी आणि त्यांच्या संरचनेसाठी ओळखली जातात. तुम्हाला प्राचीन वास्तू पाहण्यात रस असेल किंवा धार्मिक पर्यटन करण्याचा जर तुम्ही विचार केला असेल तर जीवनात एकदा तरी या मंदिरांना नक्की भेट देऊन पाहा.






