(फोटो सौजन्य: istock)
आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार
चांगली झोप दिवसातील ३० मिनिट
जरी तुम्ही डान्स केलात तरी त्यातून तुम्हाला दिवसभराची एनर्जी मिळते. मूड फ्रेश होतो. मनावरचं दडपण जात. त्यामुळे मनात सकारात्मक विचार येतात. मन एकाग्र होतं. दिवसभर लक्ष लावून काम करता येत. परिणामी रात्री शांत झोप लागते.
भूकेची समस्या
काहीजणांना भूक लागतच नसल्याची समस्या असते. जर अशा व्यक्तीने ३० तास जरी डान्स केला तरी त्यात उर्जा खर्च होते. त्यामुळे भूक-तहानही आपोआप लागते. परिणामी पचनशक्ती सुधारते. भूकेची समस्येचे आपोआपच निराकरण होते.
श्वसनप्रक्रियेत सुधार
नाचल्यामुळे श्वसनप्रक्रीया सुधारते. नाचताना शरीराची हालचाल होते. त्यामुळे श्वासाचा वेग वाढतो. त्यामुळे फुफ्फुस निरोगी राहते.
टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 6 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती
स्नायू मजबूत करते
नाचणे हा संपूर्ण शरीराला मिळणारा व्यायाम आहे. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. जर तुम्ही झुंबा, साल्सा, पोल डान्स, बॅले डान्स करत असाल तर स्नायू मजबूत होतात.
वजन कमी होते
नाचल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. परिणामी यामुळे वजनही झपाट्याने कमी होऊ लागते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






