(फोटो सौजन्य: Pinterest)
प्रत्येक देशाचा कारभार चालवण्याही त्या त्या देशात देशाचा पंतप्रधान नेमला जातो. सलग तीन वेळा जनतेचे बहुमत मिळवत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले आहेत. प्रत्येकाच्या आवडीचं कम्फर्ट फूड काही वेगळं असत, अशात जगभरातील लीडर्सना त्यांच्या ताटात कोणता पदार्थ खायला सर्वात जास्त आवडत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अलीकडेच प्रसिद्ध फूड गाईड टेस्ट अॅटलासने एक अतिशय मनोरंजक यादी शेअर केली आहे, ज्यामध्ये जगभरातील टॉप लॉडर्सना आपल्या थाळीत कोणता पदार्थ अधिक आवडतो ते शेअर करण्यात आले आहे. या यादीत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते गुजराती पदार्थ देखील आहेत जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चला या पक्वान्नाची माहिती जाणून घेऊया.
ढोकळा

या लिस्टनुसार, पंतप्रधान मोदींना आपल्या आहारात ढोकळा खायला फार आवडतो. हा गुजरातमधील एक फेमस नाश्त्याचा प्रकार आहे. हा शाकाहारी पदार्थ देशभरात आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्याला हलका फुलका पदार्थ शोधत असाल तर हा पदार्थ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हा वाफवून बनवलेला असल्याने तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. ढोकळा बनवण्यासाठी तांदूळ, डाळ, दही, सोडा आणि मसाले वापरले जातात. ढोकळाला खमण ढोकळा (Khaman Dhokla) असेही म्हणतात.
साहित्य
खांडवी

खांडवी (khandvi) हा देखील एक गुजराती नाश्त्याचा प्रकार आहे जो बेसन आणि दह्यापासून बनवला जातो. हे गुंडाळलेल्या आणि वाफवलेल्या चौरसांच्या रूपात असते आणि ते चवदार, पौष्टिक आणि आहारात चांगले मानले जाते. याला खांडवी, पाटुली, दहिवडी, सुरळीची वाडी अशा नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रातही हा पदार्थ फार फेमस आहे.
साहित्य
खिचडी

या लिस्टमध्ये तिसरा आणि शेवटचा पदार्थ आहे खिचडीला लिस्ट करण्यात आले आहे. खिचडी ही एक साधी, सोपी आणि पौष्टिक भारतीय डिश आहे. फार जुन्या काळापासून भारतात हा पदार्थ खाल्ला जात आहे. हा पदार्थ तांदूळ आणि डाळ (विशेषतः मूग डाळ) वापरून बनवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी बनवता येतात, जसे की साधी खिचडी, मसाला खिचडी, आणि डाळ खिचडी.
साहित्य






