पादण्याची समस्या कशी आणाल आटोक्यात (फोटो सौजन्य - iStock)
पोटातून गॅस बाहेर पडून पादणे ही अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाद येते. शरीरासाठी पादणे ही क्रिया अनेक प्रकारे आवश्यक आहे. याला इंग्रजीत फार्ट असेही म्हणतात. अन्न पचवताना पोटात तयार होणारा वायू शरीर पादून किंवा ढेकर देऊन बाहेर काढते. पण काही लोक मोठ्या आवाजाने पादतात किंवा पादल्यानंतर आजूबाजूला दुर्गंधी पसरते, ज्यामुळे लाजिरवाणेपणा येऊ शकतो.
आयुर्वेदिक डॉक्टर वरलक्ष्मी यांनी दुर्गंधीयुक्त आणि आवाज येणारे पादणे येण्याची काही कारणे सांगितली आहेत. त्यांना ओळखून तुम्ही लाजिरवाण्या स्थितीतून सुटका मिळवू शकता. डॉक्टरांच्या मते, एक व्यक्ती दिवसातून सरासरी १४ वेळा गॅस सोडते. यामुळे कधीकधी लाजिरवाणे वाटू शकते, परंतु ते शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, कसे ते आपण या लेखातून जाणून घेऊया
पादण्याचा आवाज जोरात न येण्यासाठी
ज्यांचा पादण्याचा आवाज मोठा आहे त्यांनी अन्न चांगले चावून खावे आणि ओठ बंद करून जेवावे. शांत आणि गंधहीन पाद येणे हे अत्यंत सामान्य आहेत. मात्र जोरात आवाज येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. तसंच तोंडाची दुर्गंधी असलेल्या लोकांनी गॅस निर्माण करणाऱ्या सल्फरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. ज्या लोकांना वारंवार गॅस होतो त्यांना Food Intolerance किंवा SIBO असू शकते, त्यामुळे त्यांनी वेळीच डॉक्टरांकडे जाऊन याचा उपाय करून घ्यावा जेणेकरू तुम्हाला सतत पादण्याचा त्रास होणार नाही आणि पोटदुखीही होणार नाही
SIBO आणि Food Intolerance म्हणजे?
SIBO याला लहान आतड्यात बॅक्टेरियाची अतिवृद्धी म्हणतात. यामध्ये लहान आतड्यात अशा जीवाणूंची असामान्य वाढ होते जे सामान्यतः पचनसंस्थेचा भाग नसतात. याला ब्लाइंड लूप सिंड्रोम असेही म्हणतात.
जेव्हा तुम्हाला Food Intolerance चा त्रास आहे हे माहीत असते तेव्हा तुम्हाला काही पदार्थ खाण्यात समस्या येतात. पचनसंस्था हे पदार्थ सहज पचवू शकत नाही आणि पोटाच्या समस्या उद्भवू लागतात, जसे की पोटदुखी, गॅस तयार होणे, पोट फुगणे इ. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर औषधं घेणं गरजेचे आहे
पादण्याची घाण दुर्गंधी येऊ नये म्हणून?
गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, पोट होईल स्वच्छ
डॉ. वरदलक्ष्मी यांनी शेअर केली महत्त्वाची बाब
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.