स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे पाणी त्वचेसाठी ठरेल प्रभावी
रोजच्या आहारात भाताचे सेवन सगळेच करतात. जेवणात जर भात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे दैनंदिन आहारात भाताचे नियमित सेवन केले जाते. भात खाल्यानंतर पोटही लवकर भरते. जेवणात वापरल्या जाणाऱ्या तांदळाचा वापर केवळ खाण्यासाठीच नाहीतर आरोग्य आणि त्वचेसाठी सुद्धा केला जातो. तांदळाच्या पाण्याचा वापर करून त्वचेवर पिंपल्स, मुरूम घालवले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र काहीवेळा चुकीचे स्किन केअर रुटीन फॉलो केल्यामुळे त्वचेची मोठ्या प्रमाणात नुकसान होते.(फोटो सौजन्य – iStock)
वाढत्या उष्णतेमुळे तळपायांची आग होते? ‘या’ पद्धतीने करा कापूरचा तेलाचा वापर, त्वचा राहील कायम थंड
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात, तर काही महिला वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे जास्त काळ त्वचा सुंदर दिसत नाही. त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्वचा सुधारण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम लावण्याऐवजी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पाण्याचा वापर कशा प्रकारे त्वचेसाठी करावा?यामुळे स्किनला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. तांदळाचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम अर्धा वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून मोठ्या वाटीभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ५ ते ६ तास पाण्यात तांदूळ भिजल्यानंतर टोपात पाणी ओतून काहीवेळ उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी थंड करून नियमित चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा अधिक सुंदर आणि उजळदार दिसतो. त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात. या पाण्यात विटामिन बी, सी आणि ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मुरुमांचे काळे डाग घालवण्यासाठी तांदळाचे पाणी अतिशय प्रभावी ठरते. या पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी होते आणि चेहरा फ्रेश सुंदर दिसू लागतो. उन्हाळ्यात त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचेवरील रॅश आणि रेडनेस कमी होईल.
७ दिवसांमध्ये होईल आरशासारखी चमकदार त्वचा! नियमित ‘या’ पद्धतीने करा कोरफड जेलचा वापर, त्वचा होईल मऊ
तांदळाच्या पाणी त्वचा हायड्रेट ठेवते. याशिवाय त्वचा मॉइश्चराइज ठेवण्याचे काम तांदळाचे पाणी करते. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. त्वचा मुलायम आणि मऊ ठेवण्यासाठी तांदळाचे पाणी वापरावे. वाढत्या वयात त्वचेमध्ये सुरकुत्या वाढू लागतात, या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा.