फोटो सौजन्य: iStock
आई, बहीण, मावशी, आजी आणि अशा कित्येक नात्यात एखादी स्त्री आपल्या जबाबदाऱ्या संभाळत असते. म्हणूनच तर अनेक जण म्हणतात की जर एखाद्या देशातील स्त्री सशक्त असेल तरच तो देश देखील सशक्त बनेल. म्हणूनच तर स्त्रियांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
दरवर्षी भारतात 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महिलांच्या सक्षमीकरणाला, त्यांच्या हक्कांना आणि समाजातील त्यांच्या योगदानाला समर्पित आहे.
हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करणे व त्यांना समानता आणि आदर देण्यासाठी जागरूकता पसरवणे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय महिला दिन फक्त 13 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? त्याचा इतिहास काय आहे? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास भारताच्या महान महिला नेत्या आणि स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांच्याशी संबंधित आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला आणि त्यांना “भारताची कोकिळा” (Nightingale Of India) म्हणूनही ओळखले जाते.
त्या केवळ कवी आणि लेखिकाच नव्हत्या तर एक उत्तम वक्त्या आणि समाजसुधारकही होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि देशाच्या (उत्तर प्रदेश) पहिल्या महिला राज्यपाल बनल्या.
Valentine Day Recipe: व्हॅलेंटाईन करा खास, गर्लफ्रेंडसाठी बनवा क्लासी रेपिसी; प्रेमाचाच होईल वर्षाव
त्यांच्या योगदानाचा आणि संघर्षाचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वाढदिवस, 13 फेब्रुवारी हा भारतात राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा आणि त्यांना सक्षम करण्याचा संदेश देतो.
राष्ट्रीय महिला दिनाचा उद्देश केवळ महिलांच्या कामगिरीचे कौतुक करणे नाही तर हा दिवस समाजातील महिलांसमोरील आव्हाने आणि असमानता देखील अधोरेखित करतो. आजही भारतात महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश असा आहे की महिलांना समान संधी मिळाल्या पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
राष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये महिलांचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाते. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्था हा दिवस खास साजरा करतात आणि महिलांच्या योगदानाला सलाम करतात.