केसांच्या काळजीचे रहस्य केले अनिरूद्धाचार्यांनी उघड (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
पहा व्हिडिओ
अनिरुद्धाचार्य यांच्या मते केसांचा शत्रू कोण?
या व्हिडिओमध्ये, अनिरुद्धाचार्य सांगतात की, शँपू हा केसांचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे सांगून पुकी बाबा एवढ्यावरच थांबले नाहीत; त्यांनी पुढे सांगितले की व्यावसायिक शॅम्पू आणि कंडिशनर दोन्हीमध्ये अशी रसायने असतात जी केसगळती कमी करत नाहीत तर वाढवतात. या गोष्टी प्रत्यक्षात केसगळतीस कारणीभूत ठरतात. ते म्हणाले, “मी माझ्या केसांवर कधीही शँपू वापरत नाही आणि कदाचित म्हणूनच माझे केस मुळांपासून मजबूत होतात.”
महागड्या हेअर सीरम व शाम्पूचा वापर करण्याऐवजी Rosemary चा वापर केल्यास केसांचे गळणे होईल कमी
शँपू खरोखर काम करत नाही का?
खरंतर, या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही. बरेच लोक शँपू आणि कंडिशनर वापरतात आणि त्यांच्या केस गळतीत फरक जाणवतो. काही लोक प्रत्यक्षात ही उत्पादने वापरतात पण त्यांच्या केसांमध्ये कोणताही बदल दिसत नाही.
जर तुम्ही या यादीत असाल, तर असे असू शकते की तुमच्या केसांना रसायनांची नव्हे तर नैसर्गिक घटकांची आवश्यकता असेल. या व्हिडिओमध्ये पुढे अनिरुद्धाचार्य यांनी त्यांच्या मजबूत, चमकदार आणि कुरळे केसांबाबत अधिक माहिती दिली आहे. शॅम्पूऐवजी ते काय वापरतात ते जाणून घेऊया.
रेसिपीमध्ये वापरलेले घटक
कसे वापरावे
लोक बाजारातून मिळणारे शँपू का वापरत आहेत?
अनिरुद्धाचार्य म्हणाले की, लोक बाजारातून शिकाकाई आणि रीठा असलेले शँपू खरेदी करतात, परंतु या उत्पादनांमध्ये खरोखरच रीठा आणि शिकाकाई आहे याची कोणतीही हमी नाही. जेव्हा तुम्ही किराणा दुकानातून तिन्ही गोष्टी स्वस्तात खरेदी करू शकता, तेव्हा रसायने खरेदी करण्यात पैसे वाया घालवण्यात काही अर्थ नाही. हा केस चांगले राखण्याचा सर्वात चांगला आणि स्वस्त उपाय आहे.






