रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी सगळ्यांचं आरामदायी आणि शरीराला न टोचणारे कपडे घालायला आवडतात. कारण रात्रीच्या वेळीस चांगली झोप येण्यासाठी आरामदायी कपडे घालण्यास प्राधान्य दिले जाते. रात्रीच्या वेळी झोपताना अनेक महिला ब्रा घालून झोपतात. पण रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपणे योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. काहीवेळा महिला हा प्रश्न डॉक्टरांना विचारण्यासाठी सुद्धा संकोचतात. पण अनेक संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपू नये. तसेच एका संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी झोपताना अंगावर एकही कपडा नसावा कारण रात्री झोपल्यानंतर शरीराच्या सर्व अवयवांना हवा मिळणे गरजेचे आहे. पण तुम्ही जर हे करू शकत नसाल तर रात्री कॉटनचे आणि हलके फुलके कपडे अंगावर घालावे. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
रकाही महिलांना ब्रा घातल्याशिवाय झोप लागत नाही. पण ब्रा घातल्यामुळे रक्तभिसरण होण्यास अडथळे निर्माण होतात. निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसेच स्तनांमध्ये रक्त नीट पोहोचू शकत नाही.त्यामुळे महिलांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. घट्ट आणि वायर्ड ब्रा घातल्यामुळे शरीरावर चट्टे किंवा डाग उठण्याची शक्यता असते. घट्ट ब्रा घातल्यामुळे पाठीमध्ये दुखण्यास सुरुवात होते.
हे देखील वाचा:सुडौल बांध्यासाठी वापरताय घट्ट ब्रा? होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम
रात्री ब्रा घालून झोपल्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. ब्रा घातल्यामुळे महिलांचे शरीर निरोगी राहते आणि शरीराला व्यवस्थित आकार येतो. पण घट्ट ब्रा घातल्यामुळे स्तनांभोवतीची त्वचा आकुंचन पावते, ज्याचा परिणाम मज्जासंस्थेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपल्यास स्तनांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
रात्री झोपताना किंवा इतर वेळी जास्त घट्ट ब्रा घातल्यामुळे पाठीवर काळे डाग पडू लागतात. तसेच त्वचेवर पुरळ, मुरूम किंवा इतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात.त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपणे गरजेचे आहे. दिवसभर घट्ट ब्रा घालून राहिल्यानंतर रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपल्यामुळे झोप चांगली लागते.
हे देखील वाचा: केवळ 1 मिनिटात कळणार आता ब्रेस्ट कॅन्सरची पहिली स्टेज, Smart Bra चा लागला शोध
दिवसभर घट्ट ब्रा घालून झोपल्यानंतर रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपाव. अन्यथा झोपेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. रात्री ब्रा घातल्यामुळे रात्रीच्या वेळी अस्वथ वाटू लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप लागत नाही. तसेच रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे स्तनांमध्ये गाठी होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी रात्रीच्या वेळी ब्रा घालणे टाळले पाहिजे.