आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय
आजपासून राज्यभरात नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ले जातात. सतत गोड पदार्थ, साखरयुक्त अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, तळलेले अन्न, चॉकलेट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते., सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील आतड्याना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात बाहेरच्या पदार्थांचे सेवन करावे. अतिमसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील आतड्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सण उत्सवाच्या दिवसांमध्ये कमीत कमी तेलकट किंवा तिखट पदार्थ खावेत.
आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सतत पाणी पिणे, फळांचे सेवन करणे, आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे इत्यादी पदार्थ खाल्ले पाहिजेत. पण काहीवेळा पोट स्वच्छ न झाल्यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून जाते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ पोटात तसेच साचून राहतात. पोटात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांचा परिणाम शरीरावर होतो. बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.त्यामुळे आतड्यांचे आरोग्य नेहमी निरोगी असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स नियमित फॉलो केल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आतड्यांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित प्या ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी
आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय
शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ घामावाटे आणि लघवीवाटे निघून जातात. तसेच सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्यास पोटातील घाण स्वच्छ होईल. कोमट पाणी प्यायल्यामुळे पोटातील आतड्या स्वच्छ होऊन आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया निघून जातील.
आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय
निरोगी आतड्यांसाठी आहारात प्रोबायोटिक्सचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रोबायोटिक पदार्थांचे सेवन केल्यास पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होऊन चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढेल. प्रोबायोटिक पदार्थांमध्ये तुम्ही दही, लोणचे, टोफू आणि प्रोबायोटिक भाज्यांचे सेवन करू शकता. आतड्यांच्या आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आहारात प्रोबायोटिक पदार्थांचे सेवन करा.
रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास आतडे निरोगी राहतील. फायबरचे सेवन केल्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडून जातात, पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते. फायबरयुक्त पदार्थांमध्ये तुम्ही फळे, भाज्या, शेंगा आणि संपूर्ण धान्ये इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता.
हे देखील वाचा: युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आजपासून नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक
आतड्यांच्या निरोगी आरोग्यसाठी सोपे उपाय
उपवास करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण उपवास केल्यामुळे पोटातील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यसाठी उपवास करणे आवश्यक आहे.