दिवाळीतील धावपळीमुळे चेहऱ्यावर थकवा वाढला आहे? मग 'या' पद्धतीने त्वचेवर लावा दही फेसपॅक
दिवाळी सणाला सगळ्यांची खूप जास्त धावपळ होते. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, पाहुणे मंडळींच्या स्वागतामध्ये संपूर्ण वेळ निघून जातो.याशिवाय दिवसभर काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्यासोबतच चेहऱ्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. पण या सगळ्याचा थकवा दिवाळी झाल्यानंतर चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली वाढलेली काळी वर्तुळ, चेहऱ्यावरील पिंपल्स, ऍक्ने, फोड इत्यादी अनेक समस्यांमुळे त्वचा निस्तेज आणि काळवंडल्यासारखी वाटू लागते. चेहऱ्यावर वाढलेला थकवा कमी करण्यासाठी महिला वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्याऐवजी त्वचा आणखीनच निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारातील महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, वेगवेगळ्या क्रीम, लोशन किंवा सीरमचा वापर करतात. या गोष्टींचा परिणाम चेहऱ्यावर जास्त दिवस दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील काळेपणा आणि थकवा कमी करण्यासाठी दह्याचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दही त्वचा हायड्रेट राहते. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा अधिकच सुंदर दिसते.
दह्याचा वापर केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय चेहऱ्यावरील कमी झालेला ग्लो पुन्हा येतो. वाटीमध्ये बेसन आणि दही मिक्स करून एकत्र पेस्ट करून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर झालेली डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल.
वाटीमध्ये दही घेऊन त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण, धूळ, माती स्वच्छ होईल. तांदळाच्या पिठात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.
ओठांवरील मऊपणा वाढवण्यासाठी ‘हे’ घरगुती पॅक ठरतील प्रभावी, थंडगार वातावरणात ओठ राहतील कायमच गुलाबी
दह्यामध्ये चमचाभर कोरफड जेल मिक्स करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर चोळून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील ओलावा कायम टिकून राहील. सगळ्यात शेवटी पपई आणि टोमॅटोचा रस एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हे उपाय केल्यामुळे त्वचेवर ग्लो येईल आणि चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी होण्यास मदत होईल.






