चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज
चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आणि ऍक्ने येणे इत्यादी अतिशय सामान्य समस्या आहे. पण कार्यक्रमाच्या आधी किंवा लग्नसराईच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर येणारे पिंपल्स सगळ्यांचं नकोसे वाटत. पिंपल्स किंवा मुरूम आल्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. पिंपल्स किंवा मोठे फोड आल्यानंतर महिला वेगवेगळे स्किन केअर किंवा महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. पण शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. त्वचा वरून चमकदार आणि सुंदर करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली जाते. पण शरीरा अंतर्गत होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. आज आम्ही तुम्हाला शरीरात होणाऱ्या कोणत्या बदलांमुळे त्वचेवर मोठे पिंपल्स आणि फोड येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब
महिलांसह पुरुषांच्या शरीरात सुद्धा हार्मोनल बदल होत असतात. पण महिलांच्या शरीरावर त्याचा जास्त परिणाम दिसून येतो. चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येऊन त्वचेचे गंभीर नुकसान होते. याशिवाय टीनएज, मासिक पाळी, गर्भधारणा किंवा तणावावेळी हार्मोन्समध्ये सातत्याने बदल होतात. या बदलांकडे सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने त्वचा पूर्णपणे निस्तेज आणि पिंपल्सने भरून जाते. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्वचेतील ऑइल ग्लँड जास्त अॅक्टिव होतात आणि चेहऱ्यावर जास्तीचे तेल तयार करतात.
नियमित पोट व्यवस्थित स्वच्छ न होणे, बद्धकोष्ठता, गॅस किंवा अॅसिडिटीचा वाढल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येण्यासोबतच अंगाला खाज येणे किंवा मोठे मोठे ऍक्ने येऊन त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारणे फार आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा तूप मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल.
जास्त तळलेले, भाजलेले पदार्थ, जंक फूड, गोड, डेअरी प्रॉडक्ट्स आणि जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात सूज वाढते. ब्लडमध्ये शुगर आणि इन्सुलिन वाढल्यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स काही केल्या लवकर कमी होत नाही. शरीराला पोषण आहार न मिळाल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढून चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात.
एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय
पीसीओएस, थायरॉइडसारख्या समस्यांमुळे हार्मोन्समध्ये सतत बिघाड होत असतात. या बिघाडांमुळे हनुवटी, जबडा आणि गालांवर पुन्हा पुन्हा पिंपल्स येऊ त्वचा निस्तेज होऊन जाते. केमिकल्स असलेले प्रॉडक्ट्स, मेकअप किंवा पुन्हा पुन्हा फेस वॉश करणे इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावरील तेल आणि ओलावा नष्ट होऊन जातो. ज्याच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त कोरडी दिसते.






