(फोटो सौजन्य – Pinterest)
पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य मानवाला उलगडले नाही. तसेच काही अशी ठिकाणेही आहेत, जी मानवापासून लपलेली आहेत किंवा फार लोकांना याची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाविषयी माहिती सांगणार आहोत ज्याला पृथ्वीवरील एलियन्सचे निवास्थान म्हटले जाते. हे ठिकाण इतके अद्वितीय आहे की, इथे जाताच वेगळ्या जगात गेल्यासारखे वाटते. आम्ही ज्या ठिकाणाविषयी बोलत आहोत, ते ठिकाण येमेनच्या किनाऱ्याजवळील हिंदी महासागरात वसलेले आहे. हे ठिकाण म्हणजे सोकोत्रा बेट. हे बेट इतके अनोखे आहे की त्याला “पृथ्वीवरील परग्रही अधिवास” असेही म्हणतात. येथील निसर्ग, वनस्पती आणि प्राणी जणू काही दुसऱ्या जगातून आणले आहेत असे वाटते.
भारतीय थायलंड-मालदीव सोडून या देशात का जात आहेत? तुम्हीही करू शकता कमी पैशात परदेश दौरा
ड्रॅगन ब्लड ट्री
सोकाट्राचे सर्वात प्रसिद्ध झाड, जे “ड्रॅगन ब्लड ट्री” म्हणून ओळखले जाते. हे झाड छत्रीच्या आकारात आहे, ज्याच्या फांद्या वरच्या दिशेने पसरलेल्या आहेत. त्याच्या देठापासून लाल रंगाचा रस निघतो, जो प्राचीन काळी औषध, जादू आणि रंग यासाठी वापरला जात असे. ही झाडे इतर कुठेही आढळत नाही.
अद्वितीय प्राणी
सोकाट्राच्या वनस्पती प्रजातींपैकी ३७% आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ९०% प्रजाती जगात इतर कुठेही आढळत नाहीत. येथील कीटक, पक्षी आणि समुद्री प्राणी देखील खूप विचित्र आहेत. उदाहरणार्थ, “सोकाट्रा ब्लू बर्ड” आणि येथील विचित्र दिसणारे सरडे पर्यटकांना प्रचंड आश्चर्यचकित करतात.
वाळवंटातील गुलाब
ही एक विचित्र वनस्पती आहे जी जमिनीवर पसरते आणि जाड, बाटलीसारख्या देठासारखी असते आणि लहान लहान गुलाबी फुले उगवतात. यांना पाहून असे वाटते की, जणू काही कोणीतरी वाळवंटात काहीतरी विचित्र सजावट ठेवली आहे असे दिसते.
पांढरी वाळू आणि निळे पाणी
बेटाच्या किनाऱ्यांवर चमकणारी पांढरी वाळू आणि स्फटिकासारखे स्वच्छ निळे पाणी आहे, ज्यामुळे ते स्वर्ग बनते. पण त्याचवेळी, खडकाळ पर्वत, गुहा आणि विचित्र आकाराचे खडक हे ठिकाण आणखीन रहस्यमयी बनवतात.
रहस्यमयी इतिहास
सोकात्राचे भौगोलिक वेगळेपण (ते ८० दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवानलँडपासून वेगळे झाले होते) ते एक अद्वितीय जैवविविधतेचे आकर्षण केंद्र बनवते. स्थानिक लोक सोकात्रियन भाषा बोलतात, जी प्राचीन दक्षिण अरबी भाषेशी संबंधित आहे. येथील गुहांमध्ये प्राचीन चित्रे आणि अवशेष सापडले आहेत, जे आपल्याला सांगतात की हजारो वर्षांपूर्वी येथे लोक राहत होते. काही कथांवर विश्वास ठेवला तर असे मानले जाते की, इथे जादू आणि आत्म्यांचा वास आहे जे या ठिकाणाला आणखीन रहस्यमयी बनवते.