दैनंदिन आहारात करा 'या' ५ रुपयांच्या पदार्थांचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
दैनंदिन आहारात हेल्दी आणि शरीराला सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. मात्र अनेक लोक आहारात जंक फूड आणि शरीरास हानिकारक असणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरतात. यामुळे पचनक्रिया बिघडणे, गॅस, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. कोथिंबीरीचा वापर जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना केला जातो. यामुळे केवळ पदार्थाची चवच नाहीतर सुंगंध वाढण्यास मदत होते. रात्री झोपण्याआधी कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. वाढलेले वजन नियंत्रणात राहील, विषारी घटक बाहेर पडून जातील, याशिवाय रक्तशुद्ध होईल. चला तर जाणून घेऊया कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य – iStock)
किडनी लिव्हर होईल डिटॉक्स! उपाशी पोटी नियमित करा पाण्याचे सेवन, शरीराला होतील कमालीचे फायदे
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. यामुळे किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन करावे. कोथिंबीरीच्या पानांचे पाणी प्याल्यामुळे यकृत व मूत्रपिंड योग्य प्रकारे कार्य करते, याशिवाय लघवीवाटे हानिकारक घटक बाहेर पडून जातात.
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर दिसून आल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. यासोबतच तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर किंवा उपाशी पोटी कोथिंबीरीचे पाणी पिऊ शकता. यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पचनसंस्था सुधारण्यासाठी मदत करतात. बद्धकोष्ठता, गॅस व अपचन इत्यादी सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. कोथिंबीरीच्या पानांमध्ये मेटाबॉलिझम वाढवणारे अनेक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करताना उपाशी पोटी कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेली चरबी हळूहळू कमी होईल आणि शरीराचे कार्य सुधारेल.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन करावे. याशिवाय चांगल्या झोपेसाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोथिंबीरीचे पाणी प्रभावी आहे.