ओझेम्पिक
भारतात ओझेम्पिकची अगदी योग्य वेळी उपलब्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२३-२४ च्या अंदाजानुसार, भारतातील १०१ दशलक्ष लोक (भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ११.४%) मधुमेहाने ग्रस्त असतील. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मधुमेहग्रस्त देश आहे. शिवाय देशात १३६ दशलक्ष लोक प्री-डायबिटीजने ग्रस्त आहेत आणि २५४ दशलक्ष लोक मध्यम स्थूलतेने ग्रस्त आहेत. हे आकडे वेगाने वाढणारे आरोग्यावरील संकट दर्शवतात ज्यासाठी पुराव्यांनी सिद्ध झालेल्या, प्रभावी उपचारांची आवश्यकता आहे.
त्वचेसाठी वरदान, खोबरेल तेल दूर करेल चेहऱ्यावरील सुरकुत्या; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
ओझेम्पिकचे क्लिनिकल फायदे:
ओझेम्पिक कसे काम करते?
ओझेम्पिक हे GLP-1 रिसेप्टर अॅगोनिस्ट आहे जे खालील गोष्टींमध्ये मदत करते:
ओझेम्पिक ही मूळ जीएलपी-१ आरए (सेमॅग्लुटाइड) थेरपी आहे. नोव्हो नॉर्डिस्कने २० वर्षांहून अधिक काळ यावर संशोधन करून ती विकसित केली आहे. जागतिक स्तरावर याचा क्लिनिकल वापर ३८ दशलक्षाहून अधिक रुग्ण-वर्षे करण्यात आला आहे. सेमॅग्लुटाइडला अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या मॉडेल यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ही बाब मधुमेह आणि स्थूलपणा असलेल्या लोकांसाठी या नाविन्यपूर्ण उपचारांचे सिद्ध आरोग्य फायदे स्पष्टपणे दर्शवते.
ओझेम्पिक आता भारतात फ्लेक्सटच पेन (FlexTouch Pen) स्वरुपात ०.२५ मिलीग्राम, ०.५ मिलीग्राम आणि १ मिलीग्राम डोसमध्ये उपलब्ध आहे. हे वापरण्यास सोपे, आठवड्यातून एकदा वापरण्याचे पेन उपकरण आहे. या वेगवेगळ्या डोस स्ट्रेंथमुळे डॉक्टरांनी निर्देशित केल्याप्रमाणे डोसेज घेता येतात आणि मधुमेहाच्या दीर्घकालीन उपचारांमध्ये मदत होते.






