जाणून घ्या त्वचेच्या प्रकारानुसार चेहऱ्यासाठी कोणते फेस सिरम योग्य
सर्वच महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. नियमित स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार दिसते. मात्र बऱ्याचदा महिला त्वचेसाठी चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट निवडतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा काळवंडलेली वाटणे, सुरकुत्या येणे, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारातील क्रीम किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. पण वारंवार क्रीम किंवा लोशन लावल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण इत्यादीच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. तेलकट किंवा चिकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आजपासूनच करा ‘हा’ प्रभावी उपाय, त्वचा कायमच राहील चमकदार
पिंपल्समुळे खराब झालेल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. कधी स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी विटामिन सी युक्त सीरम लावले जातात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे विटामिन सी सीरम उपलब्ध आहेत.अशावेळी आपल्याला त्वचेला नेमकं कोणतं सीरम सूट होईल? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या प्रकारानुसार सीरमची कशी निवड करावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. स्किन सीरमचा वापर केल्यामुळे पिगमेंटेशन, मुरुमांचे डाग, अकाली येणारे वृद्धत्व आणि काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते.
स्किन सीरम त्वचा आतून हायड्रेट करण्यासाठी मदत करते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा त्वचेची गुणवत्ता ओळखून फेस सीरम निवडावे. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. त्वचा कायम चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी फेस सीरमचा वापर करावा. पिंपल्स आल्यानंतर ते कमी करण्यासाठी विटामिन सी युक्त फेस सीरमचा वापर करावा.
तडखत्या उन्हामुळे गेलंय चेहऱ्यावरचे तेज? मग झोपण्यापूर्वी करा ‘या’ वस्तूंचा वापर