चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आजपासूनच करा 'हा' प्रभावी उपाय
वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, पिंपल्स किंवा वांग येऊन त्वचा अधिकच खराब होऊन जाते. अशावेळी त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेला पोषण देण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर किंवा इतर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करावा. शरीराला आवश्यक असलेल्या प्रभावी पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळते. वातावरणात सतत होणारे बदल, धूळ, माती, प्रदूषण किंवा इतर अनेक कारणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा सुरकुत्या येऊ लागतात.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. याशिवाय त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार दिसते. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यास कोणत्याही स्किन केअर ट्रीटमेंट किंवा उपाय कारण्याऐवजी घरगुती फेसपॅक किंवा फेसमास्क तयार करावे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल.
वाढत्या वयात त्वचा अधिक ग्लोइंग आणि तरुण दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली बोटॉक्स ट्रिटमेंट करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे उपाय करून बोटॉक्स ट्रिटमेंट करावी. यासाठी मिक्सरच्या भांड्यात जवस घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये पावडर घेऊन त्यात जेष्ठमध पावडर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात पाणी घालून तयार केलेले मिश्रण गॅसवर ठेवा. मंद आचेवर तयार केलेले मिश्रण शिजल्यानंतर जेलीसारखे मिश्रण तयार होईल.
तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर तसेच ठेवा. त्यानंतर हाताला पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा पाण्याने धुवून टाका. हा उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासोबतच त्वचेवरील सुरकुत्या सुद्धा कमी होतील. आठवड्यातून तीनदा हा उपाय केल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि तरुण दिसेल.