बाजरी (Millet) ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. रोजच्या जेवनात अनेकजन याचा समावेशही करतात. हे धान्य अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे देणारे म्हणून ओळखले जाते. अनेक रोगांचा सामना देखील बाजरी करू शकते. बाजरीला सामान्यतः पोषक तत्वांचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते कारण ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर पोषक तत्वांनी भरलेले असते.
अनेकजन बाजरीची भाकरी खातात. बाजरी हा अनेक लोकांसाठी पोषक तत्वांचा प्रमुख स्त्रोत आहे. बाजरी पिठाच्या स्वरूपात जास्त वापरली जाते. हे पीठ तांदूळ आणि गव्हाला उत्तम पर्याय आहे. याशिवाय बाजरीचे काही आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे आहेत.






