Travel News : घर-ऑफिसच्या तणावातून हवाय ब्रेक तर मग आवर्जून भेट द्या भारतातील 'या' सुंदर डेस्टिनेशन्सना ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
digital detox vacations India : आजच्या धावपळीच्या आणि जबाबदाऱ्यांनी व्यापलेल्या जीवनशैलीत महिलांना स्वतःसाठी वेळ काढणे खूप अवघड जाते. घर, ऑफिस, कुटुंब अशा जबाबदाऱ्यांच्या जंजाळात त्या अनेकदा स्वतःला हरवून बसतात. पण कधी कधी या सगळ्यातून बाहेर पडून स्वतःसाठी थोडासा “मी टाइम” घेणे आवश्यक ठरते. आणि जर हा वेळ आपल्या गर्ल गँगसोबत घालवला, तर त्याहून मजेदार आणि रिलॅक्सिंग काहीच असू शकत नाही. भारतामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत छोटी सहल करून मन मोकळं करू शकता. दोन ते तीन दिवसांच्या विकेंड ट्रिपसाठी ही ठिकाणे अगदी परफेक्ट आहेत. विशेष म्हणजे ही सर्व डेस्टिनेशन्स बजेट-फ्रेंडली आहेत. चला तर मग जाणून घेऊ या, मुलींच्या सहलीसाठी योग्य आणि अविस्मरणीय ठरणारी काही ठिकाणे.
शिमला हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येते ते बर्फाच्छादित डोंगर, हिरवळ, शांत वातावरण आणि गजबजलेली मॉल रोड. दिल्लीहून शिमला फक्त एक तासाच्या विमान प्रवासावर आहे, तसेच ट्रेन किंवा रस्त्यानेही सहज पोहोचता येते. इथे फिरताना तुम्ही चाडविक फॉल्स, जाखू मंदिर, समर हिल्स आणि काली बारी मंदिराला नक्की भेट द्या. मॉल रोडवर शॉपिंगचा आनंद घ्या आणि रात्री हॉटेलच्या बाल्कनीत बसून बर्फाळ टेकड्यांचे सौंदर्य पाहणे हा अनुभव तुम्हाला कायम लक्षात राहील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Minneapolis school shooting : अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबार; मिनियापोलिस येथील हृदयद्रावक घटनेने देश हादरला
धर्मशाळा हे एक असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला निसर्गाची जवळीक, थोडी अध्यात्मिक शांतता आणि भरपूर एन्थुजिझम अनुभवायला मिळतो. हे ठिकाण विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि आरामदायक मानलं जातं. दिल्लीहून येथे ट्रेन, बस किंवा विमानाद्वारे सहज पोहोचता येते. पठाणकोट हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे. डलहौसीलाही नक्की भेट द्या. तिथली युरोपियन आर्किटेक्चरची इमारती, हिरवीगार दऱ्या आणि शांत वातावरण तुमच्या ट्रिपला एक वेगळाच टच देईल.
जर तुम्हाला आणि तुमच्या गर्ल गँगला काहीतरी हटके आणि शांत अनुभवायचं असेल तर खज्जियार हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हिरवळीने नटलेले मैदान, भोवती पसरलेली पर्वतरांग आणि स्वच्छ हवा हे खज्जियारचे सौंदर्य आणखी खुलवतात.
दिल्लीपासून साधारण ६०० किमी अंतरावर असलेलं हे ठिकाण तुम्हाला स्वित्झर्लंडची आठवण करून देईल. फोटोशूटसाठी खज्जियार हे मुलींसाठी एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
शिमला, धर्मशाळा, डलहौसी आणि खज्जियार व्यतिरिक्त दिल्लीजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे विकेंड ट्रिपसाठी जाता येऊ शकतं. दमदमा तलावात बोटिंगचा आनंद घेता येतो, सुलतानपुरी पक्षी अभयारण्यात पक्षीनिरीक्षण करता येतं, मसूरीमध्ये हिल स्टेशनचा अनुभव मिळतो, तर कॅम्प वाईज धौज येथे कॅम्पिंग आणि ट्रेकिंगसाठी उत्तम व्यवस्था आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनच्या पुढील बैठकीबाबत सस्पेन्स कायम; पुतिनच्या खास माणसाने दिली मोठी खबर
महिलांसाठी अशा सहली केवळ मजा आणि पर्यटनापुरत्याच मर्यादित नसतात, तर त्या एकप्रकारे मानसिक विश्रांतीचा, आत्मविश्वास वाढवण्याचा आणि मैत्री अधिक घट्ट करण्याचा मार्ग ठरतात. त्यामुळे दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून काही दिवस दूर जाऊन तुमच्या गर्ल गँगसोबत ही सुंदर ठिकाणे नक्की अनुभवून पाहा.