चेहऱ्यावरील काळेपणामुळे हैराण झाला आहात? मग झटपट घरी बनवा शेवग्याच्या पानांचा फेसपॅक, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांमुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. चेहऱ्यावर जमा झालेल्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन मोठे मोठे फोड आणि पिंपल्स येतात. याशिवाय त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा डल दिसू लागते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा, सिरम आणि महागड्या क्रीमचा वापर करतात. पण तरीसुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागड्या केमिकल युक्त स्किन ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील काळेपणा आणि पिंपल्स कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळदार होईल आणि पिंपल्स, काळेडाग कमी होऊन त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य – istock)
फेसपॅक बनवण्यसाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये शेवग्याची पावडर, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, दही, कोरफड जेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मसाज करून थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करून टाका. त्यानंतर तुमच्या त्वचेला सूट होईल असे मॉईश्चरायजर लावा. शेवग्याचा फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल आणि काळे डाग नष्ट होतील.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्वचा काळी पडणे किंवा चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी कायमच त्वचेसाठी महागड्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा किंवा स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कायम टिकून राहते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. याशिवाय त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष करण्याऐवजी योग्य ते उपाय करून चेहऱ्याची काळजी घ्यावी अन्यथा त्वचा खराब होण्याची शक्यता असते.
उतारवयातही त्वचा राहील तेजस्वी! नियमित फॉलो करा ‘या’ स्किन केअर टिप्स, उतारवयातही मिळेल चमकदार ग्लो
शेवग्याच्या पानांचा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते आणि त्वचा आतून स्वच्छ होते. बऱ्याचदा बाजारात शेवग्याची पाने सहज उपलब्ध होत नाहीत. अशावेळी शेवग्याच्या पानांचा वापर करून बनवलेल्या पावडरचा वापर करावा. यामुळे एक्स्ट्रा तेल नियंत्रणात राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ होईल.






