लहान मुलांमध्ये वाढत्या डायबिटीससाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
शरीराची रोगप्रतिकारशक्ती जेव्हा पँक्रियामधील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करतात तेव्हा टाइप १ डायबेटिस होतो, ज्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे गरजेचे असते. योग्य ती काळजी घेत व योग्य त्या साधनांच्या मदतीने तुमचे मूल एक सर्वसामान्य व निरोगी आयुष्य जगू शकते. शाळेमध्ये असताना त्यांची सुरक्षितता आणि आरोग्य जपले जाईल याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज असणे, शाळेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे आणि आवश्यक त्या साधनांची रसद तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबईतील एस.एल. रहेजा हॉस्पिटलच्या डायबेटोलॉजिस्ट डॉ. सोनाली पतंगे म्हणाल्या, “टाइप १ डायबेटिस असलेल्या मुलाच्या दिनक्रमामध्ये नियमित वेळापत्रक आणि शारीरिक व्यायाम या गोष्टींचा अंतर्भाव करणे हे त्यांच्या आरोग्य व स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. आहार, व्यायाम आणि सातत्यपूर्ण देखरेख यांसारख्या संरचित उपाययोजना एकत्रित आणण्याचे काम पालकांनी केल्यास त्यांच्या पाल्याच्या रक्तातील साखरेच्या पातळीवरील नियंत्रणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांची इन्सुलिन संवेदनशीलताही वाढते आणि एका अधिक आरोग्यपूर्ण जीवनशैलीला आधार मिळतो.
डायबेटिसचे व्यवस्थापन सुलभ बनविण्यास मदत करणाऱ्या प्रगत उपाययोजनांचा स्वीकार केल्यास मुलांना डायबेटिससोबतच्या प्रवासातून मार्ग काढण्यास मदत करण्यासाठीचे पालकांचे प्रयत्न सुकर बनू शकतात. उदाहरणार्थ, दिवसरात्र ग्लुकोजची पातळी मोजणाऱ्या कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) उपकरणांचा वापर पालक करू शकतात. जेवण, शारीरिक व्यायाम आणि इन्सुलिनचे डोस यांसारख्या घटकांना ब्लड शुगर लेव्हल्स कशाप्रकारे प्रतिसाद देते, याबद्दलचा डेटा ही उपकरणे तत्क्षणी पुरवू शकतात.”
तंत्रज्ञानाचा फायदा
सीजीएम तंत्रज्ञानाचा सर्वात लक्षणीय फायदा म्हणजे त्यामुळे पालकांच्या मनावरील ताण हलका होतो. हायपोग्लायसेमिया आणि हायपरग्लायसेमियाचे रिअर-टाइम अलर्टस् थेट त्यांच्या फोनवर पाठवले जातात, त्यामुळे आपले मूल शाळेत असताना त्यांच्या ग्लुकोजच्या पातळीची चिंता सतत वागविण्याची आता उरलेली नाही. सीजीएम उपकरणे देखभाल पुरविणाऱ्या व्यवस्थांशीही जोडलेली असल्याने आरोग्यसेवा पुरविणारे व काळजीवाहू व्यक्ती यांनाही हे आकडे सामायिकपणे पाहता येतात व एका सहयोगात्मक पद्धतीने डायबेटिसचे व्यवस्थापन केले जाण्याची हमी मिळते. यामुळे सुरक्षिततेमध्ये वाढ होतेच, पण त्याचबरोबर कोणतीही संभाव्य समस्या ताबडतोब हाताळली जाईल याची खात्री मिळाल्याने पालक निश्चिंत राहू शकतात.
लहान मुलांसाठी आव्हान
लहान मुलांसाठी अत्यंत त्रासदायक
अॅबॉटच्या डायबेटिस विभागाच्या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. केनेथ ली म्हणाले, “डायबेटिसचे व्यवस्थापन, विशेषत: लहान मुलासाठी कठीण असते. अशा प्रकरणांमध्ये मुलांची काळजी घेण्यामध्ये पालक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. डायबेटिस सुलभतेने हाताळण्यासाठी व कुटुंबांना या समस्येशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) उपकरणांसारख्या तंत्रज्ञानावर चालणाऱ्या प्रगत उपाययोजनांचे प्रचंड फायदे आहेत.
डायबिटीस रूग्णांनी वाचाच, केवळ गोडच नाही तर ‘या’ पदार्थांनीही वाढते ब्लड शुगर पातळी
पूर्वीच्या सीजीएम दिसू न शकणाऱ्या तंत्रज्ञानांमध्ये केवळ आधीची आकडेवारी पुरवली जायची, याउलट प्रगत सीजीएम उपकरणे रिअल-टाइम अर्थात प्रत्येक क्षणाची, कृतीमध्ये उतरविण्याजोगी सखोल माहिती पुरवितात, ज्यामुळे मुलांच्या ब्लड ग्लुकोजच्या पातळीत होणाऱ्या चढउतारांना तत्काळ प्रतिसाद देणे पालकांना शक्य होते. स्मार्टफोनबरोबरच्या अखंड एकात्म जोडणीमुळे पालकांना आपल्या पाल्याच्या ग्लुकोज पातळीचा कल कसा आहे याचा दुरून माग ठेवता येतो व यात अनपेक्षित वाढ किंवा उतार झाल्यास त्यांना अलर्ट मिळतो, त्यामुळे वेळच्यावेळी मात्रेत फेरफार करण्यास मदत होते. अशा दर्जाच्या डेटा- संचलित फीडबॅक मिळाल्याने ग्लुकोजचे अधिक चांगले व्यवस्थापन करता येते व शाळेचा अनुभव अधिक सुकर होतो.” आपली काळजी कमी होण्यास व आपल्या पाल्याच्या डायबेटिसच्या व्यवस्थापनास मदत व्हावी यासाठी आवर्जून माहित असाव्यात अशा पाच गोष्टी पुढीलप्रमाणे
ब्लड शुगर नियमितपणे तपासा
वेळोवेळी तपासणी करणे महत्त्वाचे
पालकांनी आपले मूल शाळेत जाण्यापूर्वी त्याची ग्लुकोजची पातळी तपासायला हवी. या पातळीवर देखरेख ठेवल्याने इन्सुलिनच्या पुढच्या डोसची मात्रा निश्चित करण्यास मदत होते. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणाच्या मदतीने तुम्ही हे सहज करू शकता. या उपकरणाच्या कनेक्टेड केअर क्षमतेमुळे पालकांना एका स्मार्टफोन अॅपच्या माध्यमातून दूरस्थ पद्धतीने आकड्यांवर देखरेख ठेवता येते व आपल्या पाल्याची ग्लुकोज पातळी टार्गेट रेंजमध्ये (७०-१८० mg/dL) राहील याची खातरजमा करता येते. या सखोल आकडेवारीमुळे ताणतणाव, आहार किंवा व्यायाम यांमुळे पातळीत कशाप्रकारे चढउतार होतात याचे पॅटर्न्स ओळखण्यास मदत होते व अधिक चांगला निर्णय घेणे शक्य होते.
व्यायामासाठी मौजेचे उपक्रम शोधा
आपल्या मुलांना सक्रिय ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांना ज्यामध्ये मजा वाटेल असे व्यायाम शोधणे. एखाद्या सांघिक खेळामध्ये सहभागी होणे ही एक चांगली कल्पना आहे. सायकल चालविणे, नृत्य, कुटुंबीय व मित्रमंडळींबरोबर क्रिकेट किंवा खोखो वा कबड्डीसारखे खेळ खेळणे हेही उत्तम मार्ग आहेत. मुलांनी एकटे पडू नये यासाठी संपूर्ण कुटुंबाला सहभागी करून घ्या. एकत्र वेळ व्यतित करण्याचा व तंदुरुस्त राहण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे. मुलांना पुरेशी झोप मिळेल याचीही काळजी घ्या, कारण टाइप १ डायबेटिस असलेल्या मुलांसाठी विश्रांती अत्यंत महत्त्वाची असते.
मुलांना ताणतणावाचे व्यवस्थापन आणि स्वत:ची काळजी घेणे शिकवा
अभ्यास आणि सामाजिक दडपणे ही शालेय जीवनाचा भाग असतात, ज्यांचा रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. आपल्या पाल्याला तणावाची लक्षणे ओळखायला व गरज भासेल तेव्हा विश्रांती घ्यायला शिकवा. वाचन असो किंवा रोजनिशी लिहिणे असो किंवा मित्रमंडळींबरोबर वेळ घालवणे असो, स्वत:ची काळजी घेणे हे डायबेटिसच्या एकूणच व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते.
5:2 डाएट आणेल डायबिटीसवर नियंत्रण, रिसर्चमध्ये खुलासा; कसा कराल वापर
डायबेटिस जर्नल ठेवा
डायबिटीसबाबत संपूर्ण माहिती ठेवा
वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि कामे यांना आपल्या पाल्याच्या रक्तातील साखरेची पातळी कशाप्रकारे प्रतिसाद देते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांची ग्लुकोजची पातळी, ते काय खात आहेत आणि ते कोणकोणत्या व्यायाम प्रकारात सहभागी होत आहेत हे वेळेच्या नोंदीसह लिहून ठेवा. अशाप्रकारे, त्यांच्यासाठी काय उपयुक्त ठरत आहे आणि काय नाही याच्या आधारे तुम्ही नियोजन करू शकाल. मग ते मधल्या वेळेच्या खाण्याच्या वेळांची अदलाबदल करणे असो किंवा सकाळचे जॉगिंग किंवा संध्याकाळचा फेरफटका यांचे वेळापत्रक नव्याने बनविणे असो. मात्र आपल्या पाल्याच्या दिनचर्येत असा बदल करण्यापूर्वी किंवा त्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास नेहमी डॉक्टराचा सल्ला घ्या.
स्मार्ट आहारनियोजनाला प्रोत्साहन द्या
शाळेतील मधली सुट्टी आणि वेळापत्रकांतील अनपेक्षित बदल यांमुळे आहाराचे व्यवस्थापन आव्हानात्मक ठरू शकते. आपल्या पाल्याला संतुलित आहार कोणता हे ओळखायला व वेगवेगळ्या पदार्थांचा त्यांच्या ग्लुकोजवर कसा परिणाम होतो हे ओळखायला शिकण्यास मदत करा.
मुलांमधील डायबेटिसचे व्यवस्थापन हा एक सांघिक प्रयत्न आहे. सहज अंमलात आणण्याजोग्या या सूचनांच्या मदतीने तुम्ही त्यांना सक्रिय राहण्यास मदत करू शकता व त्याचवेळी त्यांची ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहण्याची खातरजमा करू शकता.