हिंगोली : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या वाहनावर काल शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात ११ जणांना ताब्यात घेण्यात आल आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी संताप व्यक्त केलाय.
आमदार संतोष बांगर यांनी बोलताना म्हंटले की, माझ्यावर हल्ला करणारे शिवसैनिक असूच शकत नाही. एखाद्या चोराप्रमाणे आलेल्या लोकांनी हल्ला केला असल्याने हल्ला म्हणता येणार नाही. माझ्यासोबत माझी पत्नी आणि बहिण होती. पण जर ते माझ्यासोबत नसते तर हल्ला करणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले असते. मी एकटा असतो तर हल्ला करणाऱ्यांचे एक घाव दोन तुकडे केले असते, असे बांगर म्हणाले. तसेच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. तर हल्ला झाला त्यावेळी माझ्यासोबत कुटुंबातील सदस्य नसते तर हल्ला करणाऱ्यांचे एक घाव दोन तुकडे केले असते, असे बांगर म्हणाले. हल्ला करणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) विरोधात शिंदे गट वाद पाहायला मिळाला आहे.
फक्त गाडीला टच करून दाखवा…
माझ्या गाडीला त्यांनी फक्त टच करून दाखवावे असे आव्हान मी त्यांना दिले होते आणि आजही त्यांना माझे हेच आव्हान असणार आहे. त्यांनी फक्त माझ्या गाडीच्या काचेला टच करून दाखवावे. असे पाठीमागून येणं म्हणजे लहान मुलांच्या खेळासारखं झालं आहे. जर हल्ला करायचाच होता तर त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं आम्ही तुमची गाडी अडवत आहोत. त्यांना उत्तर दिले असते असेही आमदार बांगर म्हणाले.