Maharashtra Breaking News Updates Today:
केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर खासगी भागीदाराच्या माध्यमातून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उन्नतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे.
Maharashtra Breaking News : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील संशयित शुभम खैरनार याला सीबीआयने (CBI) नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेतले असून, मध्यरात्री त्याला मुंबईकडे नेण्यात आले आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा शुभम आणि पुण्याचा धनंजय यांनी मिळून हा कट रचला होता. धनंजयने नीटचा पेपर १० लाख रुपयांना शुभमला विकला होता, ज्याची विक्री पुढे शुभमने टेलिग्रामच्या माध्यमातून १५ लाख रुपयांना केल्याचा आरोप आहे. सीबीआय आता या व्यवहारातील इतर दुवे आणि या मोठ्या साखळीचा शोध घेत आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
13 May 2026 04:58 PM (IST)
विरार येथील अर्नाळा परिसरात आज महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणावर तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या आदिवासींच्या घरांवर ही कारवाई केली जात असून, परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अर्नाळा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने सकाळी लवकरच कारवाईला सुरुवात केली. जेसीबी आणि महसूल पथकाच्या सहाय्याने अनेक घरांवर तोडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे स्थानिक आदिवासी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अनेक कुटुंबे उघड्यावर येण्याची भीती व्यक्त करत आहेत.
13 May 2026 04:48 PM (IST)
माथेरान डोंगरात असलेल्या गार्बेटवाडी येथील रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने वन जमीनीत अनधिकृतपणे खड्डे खोदले आहेत.वन विभाग याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याने संबंधित रस्त्याचे काम करणारा ठेकेदार याविषयी घेत असलेली भूमिका संशयास्पद वाटत आहे.वन जमिनीमध्ये खोदलेले खड्डे याबाबत माथेरान आणि कर्जत वन विभाग यांच्याकडून टोलवाटोलवी करीत असल्याने वन विभागाचे नक्की चाललले आहे तरी काय?असा प्रश्न आदिवासी भागातील लोक करीत आहेत.
13 May 2026 04:34 PM (IST)
भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयामार्फंत सन 2024-25 या वर्षांसाठी देण्यात येणारा आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार या गटात वासांबे ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.या पुरस्कारामुळे रायगड जिल्ह्याचा लौकीक राष्ट्रीय स्तरावर पुन्हा अधोरेखित झाला आहे.ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा स्वतः चे महसूलाचे स्त्रोत वाढवित आहे.
या यशाबद्दल ग्रामपंचायत वासांबेचे सरपंच उमाताई संदिप मुंढे, उपसरपंच दिपक कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ आदींचे अभिनंदन होत आहे.
13 May 2026 04:27 PM (IST)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात बुधवारी जास्त वर्दळ होती. कारण केडीएमसी मध्ये मनसे कार्यालयाचे लोकार्पण होते .या निमित्ताने मनसे नेते राजू पाटील खासदार श्रीकांत शिंदे मनसे आणि शिंदे गट कार्यकर्ते मोठा पोलीस बंदोबस्त आणि केडीएमसीची सुरक्षा रक्षक होते .याच दरम्यान मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती मुख्यालय आला. चप्पल डोक्याखाली ठेऊन झोपला म्हणजे केडीएमसीचे सुरक्षा रक्षक करतात काय? असा सवाल उपस्थित झाला आहे यासाठी सुरक्षा संबधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
13 May 2026 04:13 PM (IST)
डहाणू तालुक्यातील चिंचणी बीच येथे एका पर्यटकाने भरधाव कार चालवत धोकादायक स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारची सनरूफ काच उघडून चालकाने पायाच्या सहाय्याने स्टेअरिंग नियंत्रित करत कार चालवली. या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटकांच्या गर्दीत अशा प्रकारचे स्टंट केल्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. बीच परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
13 May 2026 04:03 PM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर खासगी भागीदाराच्या माध्यमातून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उन्नतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे.
13 May 2026 04:00 PM (IST)
S Jaishankar UN Speech New York : जागतिक राजकारणात भारताचे वजन वाढत असतानाच आता भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेनेही संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर आपली मोहोर उमटवली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) यांनी न्यूयॉर्कमध्ये एका अशा प्रदर्शनाचे उद्घाटन केले, जे जगाला हे सांगते की आज आपण ज्या ‘डिजिटल युगात’ जगत आहोत, त्याचे बीज हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषी आणि गणितज्ज्ञांनी रोवले होते. ‘शून्यापासून अनंतापर्यंत गणितातील भारतीय संस्कृतीचे योगदान’ असे शीर्षक असलेल्या या प्रदर्शनाने जागतिक राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
13 May 2026 03:48 PM (IST)
IPL Playoff 2026: आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी चुरस वाढली आहे. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, एसआरएच, आरसीबी, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये अजूनही स्पर्धा पाहायला मिळत आहे. मात्र 5 वेळेस विजेतपेद पटकवलेला मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले आहे. मात्र तरी देखील मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाण्यापासून अनेक संघांना रोखू शकतो असे म्हटले जात आहे. हे समीकरण कसे आहे ते जाणून घेऊयात.
13 May 2026 03:40 PM (IST)
नवी दिल्ली : कार आणि बाईक्सचे जग वेगाने स्मार्ट तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे. केवळ इंजिन आणि डिझाइनच नव्हे, तर टायरदेखील हाय-टेक होत आहेत. या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल म्हणजे पिरेलीचे नवीन तंत्रज्ञान, सायबर टायर, ज्याला आणखी प्रगत बनवले जात आहे. अलीकडे, नवीन व्हर्जन आणि एआय-संबंधित अपग्रेड्सबद्दल चर्चा सुरू आहे, ज्यामुळे भविष्यात ड्रायव्हिंग आणखी सुरक्षित आणि स्मार्ट होऊ शकते.
13 May 2026 03:30 PM (IST)
Gujrat Titans in IPL 2026: काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध एसआरएचचा सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे. साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने एसआरएचचा 86 रन्सने पराभव केला आहे. मात्र कालच्या सामन्यात साई सुदर्शनने एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे या रेकॉर्डमुळे त्याने विराट कोहली आणि ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. साई सुदर्शनने कालच्या सामन्यात 61 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली गुजरातचा संघ अडचणीत सापडलेला असताना त्याची ही कामगिरी अत्यंत मोलाची ठरली आहे. यामध्ये खास गोष्ट अशी आहे की त्याने मागील काही सामन्यात 5 पेक्षा जास्त वेळेस 50 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात 500 रन्स करणारा साई सुदर्शन हा पहिला खेळाडू ठरला आहे. यामध्ये त्याने वैभव सूर्यवंशी, विराट कोहली आणि अभिषेक शर्माला मागे टाकले आहे.
13 May 2026 03:18 PM (IST)
Satara News: वाढती महागाई, आंतरराष्ट्रीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या सतत वाढणाऱ्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ‘इंधन वाचवा’ असे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांना वाहनांचा अनावश्यक वापर कमी करण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करण्याचे, कारपूलिंग वाढवण्याचे आणि सीएनजी व इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे आवाहन केले. परंतु पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर देशभरात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे: हा संदेश केवळ सामान्य नागरिकांसाठी आहे की मंत्री, आमदार आणि प्रमुख राजकारणीसुद्धा पुढाकार घेणार आहेत? विशेषतः सातारा जिल्ह्यात, जिल्ह्यातील चार प्रभावशाली मंत्री—पालक मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे—आता त्यांच्या डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या आलिशान एसयूव्ही गाड्या सोडून सीएनजी किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
13 May 2026 02:58 PM (IST)
राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
13 May 2026 02:50 PM (IST)
डोंबिवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाचा ईशाळवाडी ट्रेक दरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृत्यू झालेला तरुण हा आपल्या पाच मित्रांसोबत खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध इर्शाळवाडी गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र तो घरी मृत्यू झालेल्या अवस्थेत पोहोचला. या दुर्दैवी घटनेमुळे रितेशच्या मित्रपरिवारासह संपूर्ण डोंबिवली परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे.
13 May 2026 02:39 PM (IST)
जागतिक राजकारणात आणि विशेषतः आखाती देशांमधील तणावाने आता समुद्राच्या तळापर्यंतचा प्रवास केला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष (US-Israel Iran War) आता केवळ क्षेपणास्त्रे आणि विमानांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इराणने जगातील सर्वात संवेदनशील तेलमार्ग असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त आपला सर्वात घातक ‘नारवाल’ (Narwhal) हा पाण्याखालील स्वायत्त ड्रोन (UUV) तैनात केला आहे. या ड्रोनच्या प्रवेशामुळे सागरी युद्धाची संपूर्ण समीकरणे बदलली असून, अमेरिकेसारख्या महासत्तेसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
13 May 2026 02:30 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर 24 तासांच्या आतच केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. सोन्या-चांदीच्या आयातीवरील सीमा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता भारतात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची आयात करणे महाग होणार असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेतील किमतींवर होणार आहे. सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवले आहे. सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर 10% मूलभूत सीमा शुल्कासह 5% उपकर आकारला आहे. कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरासह सीमा शुल्क 15% पर्यंत पोहोचले आहे.
13 May 2026 02:19 PM (IST)
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या 33 पैकी 30 क्षेपणास्त्र तळ अजूनही सक्रिय आहेत. हा तोच प्रदेश आहे, जिथून जगातील सुमारे 20% तेलपुरवठा होतो. जर तणाव पुन्हा वाढला, तर अमेरिकेची युद्धनौका आणि तेलवाहू जहाजे धोक्यात राहू शकतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणची लष्करी शक्ती नष्ट झाल्याचा दावा केला होता. पण आता अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालामुळे ट्रम्प यांच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
13 May 2026 02:08 PM (IST)
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून तब्बल 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून नाशिकमध्ये निर्मल गोदावरी प्रकल्प, शुद्ध गोदावरी अभियान, रामकालपथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणा यांसारख्या विविध विकासकामांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार असल्याचं नाशिकच्या महापौरांनी सांगितलं.
13 May 2026 01:56 PM (IST)
पश्चिम आशियातील तणाव आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन वापराबाबत संयम आणि काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर विविध राज्य सरकारांनीही पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात 50 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. मोहन यादव यांनीही राष्ट्रीय हितासाठी इंधन बचतीचं आवाहन करत वाहन रॅली बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही स्वतःच्या ताफ्यात कपात केली असून शक्य तिथे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे.
13 May 2026 12:57 PM (IST)
नाशिकच्या TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या घरात निदा खानला लपवलं होतं ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवत हि तोडाक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.
13 May 2026 12:48 PM (IST)
TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून आज घरावर बुलडोझर कारवाई करत घर जमीनदोस्त करण्यात आलं आहे.
13 May 2026 12:35 PM (IST)
शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पती पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल
मोबाईल रिचार्ज दुकानातून सुरू झाला होता हनी ट्रॅप चा खेळ
आधी शेतकऱ्यांनी दिली होती दहा हजार उसनवारीवर त्यानंतर संबंधित महिलेच्या संपर्कात आला होता शेतकरी
महिलेने आपल्या मायाजालामध्ये या शेतकऱ्याला ओढले आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू केली
13 May 2026 12:23 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या वाहनांच्या ताफ्याचा आकार कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या 'विशेष सुरक्षा गटाला' (SPG) आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.
13 May 2026 12:12 PM (IST)
समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे मंगळवारी लखनौमध्ये निधन झाले.
13 May 2026 12:07 PM (IST)
केंद्राच्या सूचनांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे सर्व नियोजित परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आधी मंजूर झालेले दौरेही थांबवण्यात येणार आहेत. अभ्यास, बैठका आणि विविध कामांसाठी होणारे विदेश दौरे सध्या स्थगित करण्यात येणार असून मंत्र्यांच्या ताफ्यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
13 May 2026 12:00 PM (IST)
एका भीषण अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्तीच शरीर वाईटरित्या चिरडल्याच दिसून आलं. घटना अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडल्याची माहिती आहे. एका तरुणाने विमानतळाचे सुरक्षा कुंपण ओलांडून रनवेवर प्रवेश केला आणि हिच चूक पुढे त्याला महागात पडली. लॉस एंजेलिसला जाणारे फ्रंटियर एअरलाइन्सचे फ्लाइट ४३४५ उड्डाणासाठी तयार होत होते. अशात पायलटने इंजिन सुरू करताच काही सेकंदातच तरुणाचे शरीर विमानाने चिरडले गेले आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
13 May 2026 11:50 AM (IST)
भारतातील सर्वात जुन्या कौटुंबिक व्यवसायांपैकी एक आणि १४८ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या बजाज समूहाने आज आपल्या व्यवसायाची १०० वर्षे पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक टप्प्यावर बजाज समूहाला शुभेच्छा दिल्या. हा टप्पा भारताच्या स्वतःच्या प्रवासाचा, स्वातंत्र्यलढ्यापासून ते जागतिक आर्थिक महासत्ता होण्यापर्यंतचा आरसा आहे.
13 May 2026 11:40 AM (IST)
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे देशाला आव्हान केल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी खर्चामध्ये कपात करण्याच्या उद्देशाने, त्यांनी आपल्या अधिकृत ताफ्याचा (कॉन्व्हॉयचा) आकार निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. या दिशेने पाऊल उचलत, त्यांनी ‘विशेष सुरक्षा दलाला’ (SPG) आपल्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येत ५० टक्क्यांची कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे तात्काळ पालन करत, SPG ने ताफ्याचा आकार कमी केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयापासून प्रेरणा घेऊन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील आणि दिल्ली सरकारनेही अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
13 May 2026 11:40 AM (IST)
बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात झाल्याची बातमी समोल आली आहे. गोजुबावी गावच्या जवळ रेडबर्ड फ्लाईट अॅकॅडमीचे एक शिकाऊ विमान कोसळले. अर्धा तासापूर्वी झालेल्या या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी विमानातील शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. बारामतीत सातत्याने होणाऱ्या या विमान अपघातांच्या मालिकांमुळे प्रशिक्षणादरम्यानच्या तांत्रिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि मदतकार्य पोहोचले आहे.
13 May 2026 11:30 AM (IST)
पश्चिम आशियातील तणाव पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणचा प्रस्तावर फेटाळला असून तणाव अधिक वाढला आहे. याच वेळी एक खळबळजनक दावा समोर आला आहे. मध्यस्थीचा आव आणणाऱ्या पाकिस्तान इराणच्या लष्करी विमानांना आपल्या तळांवर लपवून अमेरिकेची दिशाभूल करत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये केला जात आहे. या दाव्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.
13 May 2026 11:20 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा परिषदेने ३५ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपयांचा पूरक पाणी टंचाई कृती आराखडा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या आराखड्याला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंजुरी दिली आहे. या कृती आराखड्यात पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.
13 May 2026 11:10 AM (IST)
व्हिडिओमध्ये एक अतरंगी एटीएम दिसून आले जिथे लोक पैसे काढण्यासाठी नाही तर चक्क केस कापण्यासाठी जाताना दिसले. मोठा एसबीआयचा फलक, निळे दिवे, काचेचा दरवाजा आणि २४-तास सेवेचा फलक. पण आतमध्ये कॅश मशीनऐवजी चक्क एक हेअर कटिंग सेवा सुरु करण्यात आली होती. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
13 May 2026 11:00 AM (IST)
गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात पाणीकपात केली जाते, वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेतला जात आहे. या वर्षीदेखील जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती आहे. पण जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा परिषदेने ३५ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपयांचा पूरक पाणी टंचाई कृती आराखडा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या आराखड्याला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंजुरी दिली आहे. या कृती आराखड्यात पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.
13 May 2026 10:50 AM (IST)
बॉलीवुड गायक Jubin Nautiyal यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या गाडीचा समावेश केला आहे. ही गाडी आहे करोडो रुपयांची BMW i7. विशेष म्हणजे जुबिन नौटियाल यांनी शोरुममधून नवीन गाडी खरेदी करण्याऐवजी सेकंड हँड गाडी खरेदी करण्याला अधिक प्राधान्य दिलं आहे. देहरादूनमध्ये राहणाऱ्या गायक जुबिन नौटियाल यांना त्यांच्या इलेक्ट्रिक लग्जरी गाडीची डिलीव्हरी एका वेगळ्या अंदाजात देण्यात आली. जुबिन नौटियाल यांच्या नव्या BMW i7 चे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या गाडीची किंमत किती आहे आणि त्याचे खास फीचर्स काय आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.
13 May 2026 10:40 AM (IST)
पाकिस्तान(Pakistan) मध्ये एक भयंकर घटना घडली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन वाहतूक पोलिसांचाही समावेश आहे. तसेच अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
13 May 2026 10:30 AM (IST)
जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांचा विचार करता आज १३ मे रोजी, बुधवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, वाढीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३० पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,४५४ च्या पातळीवर व्यवहार करत होता. आजच्या व्यवहारात गुंतवणूकादारांसाठी कोणते शेअर्स जास्त फायद्याचे ठरू शकतात, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
13 May 2026 10:20 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड ही इन गेम करन्सी आहे. डायमंड खर्च करून प्लेअर्स विविध गेमिंग वस्तू खरेदी करू शकतात, ज्यामुळे गेमिंग अनुभव अधिक दमदार होतो. प्लेअर्स डायमंड खर्च करून स्किन्स, बंडल, इमोट्स आणि इतर अनेक प्रीमियम आयटम्स खरेदी करू शकतात. मात्र डायमंड मिळवण्यासाठी प्लेयर्सना टॉप अप करावा लागतो. मात्र जर तुम्ही खोट्या वेबसाईट किंवा एखाद्या सोशल मीडिया लिंकवरून टॉप अप केलं तर तुमचं अकाउंट हॅक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे फ्री फायर मॅक्समध्ये टॉप अप करताना अधिकृत वेबसाईटचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. फ्री फायर मॅक्समध्ये सुरक्षित पद्धतीने टॉप अप कसा करू शकता, याबाबत आता जाणून घेऊया.
13 May 2026 10:10 AM (IST)
मे महिना सुरु आहे, प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असते. आजच्या दिवशा इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या, ज्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत. आज डॉ. भालचंद्र दिनकर फडके, ज्यांना मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक मानले जाते. त्यांनी कथाकार खानोलकर, दलित साहित्य – वेदना आणि विद्रोह, मराठी लेखिका चिंता आणि चिंतन अशी काही प्रसिद्ध पुस्तके लिहीली आहेत. त्यांनी समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी आणि प्रेरणा देणारी आहेत. याशिवाय आजच्या दिवशी १९९३ मध्ये स्वतंत्र भारताच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. तसेच १९६२ मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यांसारख्या अनेक घटना इतिहासरात घडल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
13 May 2026 10:00 AM (IST)
Baramati Plane Crash: बारामती तालुक्यातील गोजुबावी गावच्या हद्दीत 'रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी'चे एक शिकाऊ विमान कोसळल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. गेल्या अर्ध्या तासापूर्वी झालेल्या या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले, तरी विमानातील शिकाऊ वैमानिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बारामतीत सातत्याने होणाऱ्या विमान अपघातांच्या मालिकेमुळे प्रशिक्षणादरम्यानच्या तांत्रिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि मदतकार्य पोहोचले आहे.
13 May 2026 09:35 AM (IST)
Malegaon Heatwave : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये यंदाचा मे महिना सर्वाधिक उष्ण ठरत असून तापमानाने ४३.८ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मार्च आणि एप्रिलनंतर आता मे महिन्यातही पारा सातत्याने ४० अंशांच्या पुढे राहत असून, गेल्या सहा दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. या वाढत्या उष्म्यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक उन्हाच्या तडाख्याने पुरते हैराण झाले आहेत. उष्णतेपासून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून स्थानिक प्रशासनानेही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
13 May 2026 09:30 AM (IST)
Gold Import Duty Hike : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परकीय चलन साठ्याचे संरक्षण करण्यासाठी आणि चालू खात्यातील तूट (CAD) कमी करण्यासाठी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत सोन्याच्या आयात शुल्कात (Import Duty) ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के इतकी मोठी वाढ केली आहे. यामध्ये १० टक्के मूळ सीमा शुल्क आणि ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकराचा (AIDC) समावेश आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयावर येणारा दबाव कमी करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
13 May 2026 09:25 AM (IST)
Prateek Yadav Passes Away: समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे लखनऊ येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले आहे. अवघ्या ३८ वर्षांच्या प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, त्यांच्या निधनाने यादव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलायम सिंह यादव आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे चिरंजीव असलेले प्रतीक यादव हे राजकारणापासून दूर राहून स्वतःचा व्यवसाय सांभाळत होते. त्यांच्या अकाली निधनानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
13 May 2026 09:17 AM (IST)
Virat Kohli Instagram Controversy: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली सध्या एका जुन्या इन्स्टाग्राम 'लाईक' प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी विराटच्या अधिकृत अकाऊंटवरून जर्मन मॉडेल लिजलाज (LizLaz) हिच्या एका फोटोला लाईक करण्यात आले होते, ज्यावरून सोशल मीडियावर मोठे वादळ उठले होते. आता या प्रकरणी खुद्द लिजलाजने एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीत तिने कबूल केले की, काही पत्रकारांनी आणि माध्यमांनी तिला विराट कोहलीविरुद्ध खोटे आरोप करण्यासाठी आणि त्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर दिली होती.
लिजलाजने स्पष्ट केले की, तिला विराटबद्दल नकारात्मक बोलण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता, मात्र तिने या ऑफरला स्पष्ट नकार दिला. "विराट माझा आवडता क्रिकेटपटू आहे आणि प्रसिद्धी किंवा पैशांसाठी मी कोणाच्याही प्रतिमेला धक्का लावणार नाही," असे तिने ठामपणे सांगितले. या खुलाशामुळे विराटला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले असून, सोशल मीडियावर कोहलीच्या चाहत्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
13 May 2026 09:10 AM (IST)
Trump China Visit & Iran Conflict: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले असून, बीजिंगला पोहोचण्यापूर्वीच त्यांनी इराण युद्धाबाबत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. इराणवरील इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर ऊर्जेचे संकट आणि कच्चे तेल तसेच एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला असताना, ट्रम्प यांनी स्पष्ट केले की इराणसोबतचे हे युद्ध संपवण्यासाठी किंवा तोडगा काढण्यासाठी त्यांना चीनची किंवा शी जिनपिंग यांच्या मदतीची मुळीच गरज नाही. 'आम्ही हे युद्ध शांततेने किंवा अन्य मार्गाने जिंकूच, पण त्यासाठी कोणाचेही सहकार्य अपेक्षित नाही' असे म्हणत त्यांनी चीनला एक प्रकारे मोठा धक्का दिला आहे.
13 May 2026 09:05 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळण्यात आल्याची यादी समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार सुनील तटकरे यांनी काल रात्री शरद पवार यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी कार्यकारिणीच्या यादीबाबत भाष्य केले असून, या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रामुख्याने तांत्रिक बाबी आणि पक्षांतर्गत फेरबदलांच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा आगामी राजकीय घडामोडींचे संकेत मानली जात आहे.
13 May 2026 09:00 AM (IST)
Thalapathy Vijay CM Update: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर करत अभिनेते थलपती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने ऐतिहासिक यश मिळवले असून, राज्यात सत्तापालट झाला आहे. सिनेसृष्टीतील करिअरला बाजूला सारून राजकारणात आलेल्या सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच तातडीने प्रशासकीय कामांना सुरुवात केली असून ते पूर्णपणे 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहेत. अनेक दशकांपासून असलेल्या प्रस्थापित राजकीय समीकरणांना छेद देत विजय यांनी मिळवलेल्या या विजयामुळे दक्षिण भारताच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले आहे.
13 May 2026 08:55 AM (IST)
IPL 2026 Points Table Update : आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (१२ मे) झालेल्या ५६ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ८२ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत १६ गुणांसह थेट पहिले स्थान पटकावले असून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB) दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे.साई सुदर्शन (६१) आणि वॉशिंग्टन सुंदर (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने १६८/५ धावा केल्या. २६९ धावांचे आव्हान असलेल्या हैदराबादचा संघ केवळ ८६ धावांवर गारद झाला. कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ३ बळी घेत हैदराबादचे कंबरडे मोडले.






