Maharashtra Breaking News Updates Today
Pune Police Exclusive News: पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक पदांची तब्बल ३५ टक्के पदे रिक्त असून, त्यामुळे त्याचा थेट दैनंदिन कामकाजावर मोठा ताण पडत असल्याचे चित्र आहे. विशेषतः नव्याने सुरू करण्यात आलेले पोलिस ठाणी तसेच नियोजित ४० पोलिस चौक्या सुरू करण्याचे नियोजनही बारगळले आहे.
पुणे आयुक्तालयाने शहरातील पोलिसिंग अधिक प्रभावी तसेच सर्व सामान्य नागरिकांना जलद प्रतिसाद मिळावा यासाठी नुकतेच नवीन ७ पोलिस ठाणी सुरू केली. आयुक्तालयाच्या अखत्यारीत ४४ पोलिस ठाणे, एक सायबर पोलिस ठाणे आणि ११० पोलिस चौक्या कार्यरत आहेत. शहराचा सातत्याने होत असलेला विस्तार, नव्याने समाविष्ट होणारे भाग, वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलिस चौक्या असाव्यात.
14 Jul 2026 06:00 PM (IST)
सोनाजी गाढवे/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षेचा (HSC) निकाल मंगळवार (दि. १४ जुलै) रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला. यंदा राज्यभरातून परीक्षेसाठी १,०३,६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,०२,०५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि ३९,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे राज्याचा (Career) एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाचा तपशील जाहीर केला.
14 Jul 2026 05:50 PM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना संवेदनशील कथानकातून मांडणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर हा चित्रपट Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. पी.पी. सिनेप्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून, लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे.
14 Jul 2026 05:40 PM (IST)
Hormuz Tension : नवी दिल्ली : होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात होर्मुझमधील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा कठोर शब्दांत निषेध करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सुरक्षित आणि निर्बंधविरहित सुरु करण्याची मागणी भारताने केली.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, व्यापारी जहाजे आणि नागरिकांच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले तातडीने थांबवावेत. संबंधित देशांनी संवाद आणि राजनैतिक मार्गाने हा वाद सोडवावा, असे आवाहन भारताने केले आहे.
14 Jul 2026 05:20 PM (IST)
भारतातील ब्लिंकइट, झेप्टो आणि इतर क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या जलद डिलिव्हरी गतीमागील मुख्य कारण म्हणजे त्यांचे डार्क स्टोअर्स. ही छोटी गोदामे आहेत, जी १०-१२ मिनिटांत ऑर्डर्सची डिलिव्हरी करतात. पण प्रश्न असा आहे की, ही डार्क स्टोअर्स उघडण्यासाठी किती खर्च येतो आणि एवढी गुंतवणूक केल्यानंतर किती महसूल मिळतो? सगळं सविस्तर जाणून घेऊयात. ब्लिंकइट आणि झेप्टोसारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी डार्क स्टोअर उघडणे हे काही स्वस्त काम नाही. लहान प्रमाणावर, हा व्यवसाय १५-२० लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतो, ज्यामध्ये मूलभूत गोदामाची जागा, रॅक्स, तंत्रज्ञान आणि मर्यादित मालसाठा असतो.
दरम्यान, मिड-लेवल सेटअपसाठी हा खर्च ₹२०-₹४० लाखांपर्यंत वाढू शकतो, विशेषतः महानगरांमध्ये जिथे भाडे आणि परिचालन खर्च जास्त असतो. ब्लिंकइटसारख्या मॉडेल्ससाठी, दुकानाच्या ठिकाणानुसार आणि आकारानुसार, साधारणपणे ₹१५-₹३५ लाखांची गुंतवणूक लागते.
14 Jul 2026 05:10 PM (IST)
FDA Blood Bank Action News: राज्यातील नियामक मानकांची पूर्तता करणारे सुरक्षित आणि उच्च दर्जाचे रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी एफडीएने (FDA) नियमांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्या आणि रक्त साठवण केंद्रांविरुद्ध व्यापक मोहीम राबवली. एप्रिल ते जून या कालावधीत ३८ केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आली; त्यापैकी ३४ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर चार केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.
सध्या राज्यात ४१३ परवानाधारक रक्तपेढ्या आणि ४६८ परवानाधारक रक्त साठवण केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे, एफडीए राज्यभरातील या केंद्रांवर कडक देखरेख ठेवते. एप्रिल ते जून दरम्यान केलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळून आल्या. परिणामी, २१ रक्तपेढ्या आणि १३ रक्त साठवण केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर दोन रक्तपेढ्या आणि दोन रक्त साठवण केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या तपासणीत परवान्याच्या अटींचे उल्लंघन, गुणवत्ता व्यवस्थापनातील त्रुटी, नोंदी ठेवण्यातील विसंगती आणि तापमान नियंत्रण, रक्त चाचणी, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व इतर कायदेशीर आवश्यकतांबाबतच्या मानकांचे पालन न करणे यांसारख्या गंभीर उणिवा निदर्शनास आल्या.
14 Jul 2026 05:01 PM (IST)
भारतीय नौदलाच्या ताफ्यात गेल्या काही आठवड्यांत चार नव्या युद्धनौकांची भर पडली असून, देशाच्या सागरी सुरक्षेसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे. समुद्रातील वाढती आव्हाने लक्षात घेता भारत सातत्याने आपली नौदल क्षमता मजबूत करत आहेत. नव्याने दाखल झालेल्या या युद्धनौकांमुळे किनारीपट्टीचे संरक्षण, सागरी गस्त आणि विविध लष्करी मोहीमा अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार आहे. भारताची जवळपास 11 हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची किनारुपट्टी आहे. याशिवाय देशाचा मोठा व्यापार समुद्रमार्गे होत असल्याने समुद्रातील सुरक्षा कायम ठेवणे अत्यंत गरजेचे ठरते. याच उद्देशाने भारतीय नौदलात आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नव्या युद्धनौकांचा समावेश करण्यात आला आहे. या जहाजांमध्ये आयएनएस दुनागिरी, आयएनएस संधायक, आयएनएस अग्रय आणि आयएनएस महेंद्रगिरी यांचा समावेश आहे.
14 Jul 2026 04:57 PM (IST)
महाराष्ट्रातील पान व्यापाऱ्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एका आंदोलनात, ‘महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ’च्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर एक ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील ७ लाख पेक्षा जास्त पान विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व पाहायला मिळाले. लहान व्यापाऱ्यांवर आयपीसी (IPC) कलम ३२८ आणि मकोका (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) च्या कथित गैरवापराच्या विरोधात या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वाचा सविस्तर...
14 Jul 2026 04:47 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षेचा (HSC) निकाल मंगळवार (दि. १४ जुलै) रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला. यंदा राज्यभरातून परीक्षेसाठी १,०३,६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,०२,०५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि ३९,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे राज्याचा (Career) एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाचा तपशील जाहीर केला. वाचा सविस्तर...
14 Jul 2026 04:40 PM (IST)
उत्तर इराणच्या गोलेस्तान प्रांतात अमेरिकेने केलेल्या एका मोठ्या क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यात अक टेकेह खान रेल्वे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अमेरिकेच्या हवाई मोहिमेचे लक्ष दक्षिणेकडील पारंपरिक लष्करी तळांवरून युरेशियातील महत्त्वाच्या भू-आधारित पायाभूत सुविधांकडे वळले आहे. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यामुळे इराण, मध्य आशिया, रशिया आणि चीन या तीन जागतिक महासत्तांना जोडणारी एक प्रमुख त्रिपक्षीय पुरवठा साखळी खंडित झाली आहे. वाचा सविस्तर...
14 Jul 2026 04:27 PM (IST)
बीड एसटी विभागात बाहेरून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांवर ज्येष्ठतेच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. परिपत्रकाची योग्य अंमलबजावणी करून सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय द्यावा, अन्यथा आत्मसन्मानासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
14 Jul 2026 04:17 PM (IST)
हरियाणातील गुरुग्राममध्ये 25 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आरोपीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून मोबाईल कॉल, चॅट आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे.
14 Jul 2026 04:07 PM (IST)
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या निकषात मोठा बदल करण्यात आला असून लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या बठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
14 Jul 2026 04:00 PM (IST)
बनासकांठा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता बनासकांठा जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधांतून एका 9 मुलांच्या आईने आपल्या प्रेमी आणि त्याच्या साथीदारासह मिळून स्वतःच्याच पतीची कथितपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं?
14 Jul 2026 03:55 PM (IST)
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात चार दिवसांपूर्वी सुनावणी करत असताना एका वकिलाने न्यायाधिशांवर कागदपत्रे फेकत अपशब्द वापरल्याचा प्रकार घडला होता. या सर्व घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत झाल्याने या मुद्द्याबाबत देशभरात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या. या सर्व घटनाक्रमावर आता देशाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. वाचा सविस्तर
14 Jul 2026 03:50 PM (IST)
वाशीम: वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एकाचवेळी संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने भरधाव कारमध्येच पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तीन निरागस मुलांना सोबत घेऊन तो थेट कारंजा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर पोलिसांसह उपस्थितांच्याही काळजाचा ठाव घेणारे दृश्य पाहायला मिळाले. आईची हत्या झाल्याची कल्पनाही नसलेली तीन चिमुकली मुलं पोलीस ठाण्यात अंथरलेल्या ब्लँकेटवर शांतपणे झोपली होती, तर त्यांचे वडील पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देत होते. नेमकं काय घडलं?
14 Jul 2026 03:45 PM (IST)
महागाईचं दणका आता सामान्यांना चांगलाच बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते रोजच्या जीवनातील वापरापर्यंत सगळ्याचेच दर वाढले आहेत. जर तुम्ही आता किंवा दिवाळीपूर्वी कधीही तुमचे घर रंगवण्याचा विचार करत असाल, तर त्याचंही बजेट आणखीनच वाढणार आहे. देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी, एशियन पेंट्सने, निवडक पेंट उत्पादनांवर १२% पर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. पण नेमकी ही दरवाढ का करण्यात आली. कंपनीचे म्हणणे आहे की, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे कच्च्या मालाचा आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे, ज्यामुळे हा निर्णय घेण्यास भाग पडले आहे. हे नवीन दर कधीपासून लागू होतील आणि त्याचा काय परिणाम होईल?
14 Jul 2026 03:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी, गोर बंजारा समाजाला आरक्षणविषयी नेमलेल्या समितीकडून अहवाल घेऊन तो तात्काळ केंद्र सरकारला (Central Goverment) पाठवून लवकरात लवकर शिफारस करावी, आणि एसटी आरक्षण मिळविण्यासाठीची पावले उचलावी, अशी मागणी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी केली. वाचा सविस्तर
14 Jul 2026 03:35 PM (IST)
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ई-केवायसी (e-KYC) आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रियेनंतर 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळल्याचा दावा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर
14 Jul 2026 03:30 PM (IST)
अमेरिका इराण संघर्ष पुन्हा पेटला आहे. दोन्ही देशांमध्ये हल्ले सुरु असून होर्मुझमध्येही तणाव वाढला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने अमेरिका आणि इराणला तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच होर्मुझमधील जहाजांची सुरक्षितात तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, तणाव कमी करण्यासाठी चीन आपले प्रयत्न सुरूच ठेवेल.
14 Jul 2026 03:25 PM (IST)
Sex Education in Schools: बहुतांश भारतीय आजही सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोलण्यास कचरतात. या विषयाला बंद खोलीतील विषय मानले जाते. परंतु, आता काळानुसार विचार बदलण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, देशभरातील शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सरकारला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळताच देशभरातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. वाचा सविस्तर
14 Jul 2026 03:20 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर: शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. नव्या जलशुद्धीकरण केंद्रातील गळती, व्हॉल्व्ह बदलण्याचा वाद आणि पंप सुरू करण्यावरून निर्माण झालेल्या पेचामुळे नागरिकांना अपेक्षित वाढीव पाणी अद्याप मिळू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली असून, बुधवारी दि.१५ जुलै रोजी मुंबईत दुपारी २.३० वाजता उच्चस्तरीय बैठक होणार आहे. वाचा सविस्तर
14 Jul 2026 03:15 PM (IST)
मंचर : पुणे-नाशिक जुन्या महामार्गावरील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक वीर अनिल शिंदे (वय १७, रा. अवसरी खुर्द ता.आंबेगाव) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य दोघे विद्यार्थी तेजस महेश भालेराव आणि साहिल संदीप टेमकर दोघेही (रा. अवसरी खुर्द) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर
14 Jul 2026 03:10 PM (IST)
Sanjay Raut News: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. उर्वरित अजित पवार गट आणि शिंदे गट हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पक्ष आहेत. आता त्यांच्या पक्षात ज्या कुरबुरी आहेत त्यावर शिवसेनेने का बोलाव. शरद पवारांचा पक्ष हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे. अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांची प्रतिक्रीया दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष भाजप प्रणित महायुतीत दाखल होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर
14 Jul 2026 03:05 PM (IST)
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघतात. यंदाही आषाढी वारीसाठी अनेक वारकीर चालत पंढीरीला निघाले आहेत. परंतु सोमवारी(१३ जुले) सकाळी या वारीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिले. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून घटनेचा तपास सुरु आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर
Pune - A live video has emerged showing the aftermath of a devastating road accident in Jejuri, Pune district, where a truck ploughed into a group of Warkari devotees participating in the Ashadhi Wari pilgrimage.The incident occurred on Monday (July 13) on the Saswad-Jejuri Road… pic.twitter.com/NTvZ732UJ9
— NextMinute News (@nextminutenews7) July 14, 2026
14 Jul 2026 02:59 PM (IST)
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात संशयित एटीएसच्या ताब्यात आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) राज्यव्यापी धडक कारवाईचे पडसाद आता थेट कोकणात उमटत आहे. ATSचे धागेदोरे आता चिपळूणपर्यंत पोहोचले आहेत.
14 Jul 2026 02:51 PM (IST)
उल्हासनगर येथील बिर्ला गेटसमोर हिट ॲण्ड रनची थरारक घटना घडली आहे. देवेंद्र सिंह राजपूत आणि त्यांचा मुलगा संजय सिंह राजपूत हे दुचाकीवरून शहाड स्टेशनच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर कार चालकाने काही अंतरावर वाहन थांबवलं. मात्र नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने कार मागे घेत पुन्हा जखमी देवेंद्र सिंह राजपूत यांच्या अंगावरून कार चालवत घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. यात देवेंद्र सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला आहे.
14 Jul 2026 02:40 PM (IST)
शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार सत्ताधारी महायुती येण्यावरून, एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी यावर सांगणं उचित होणार नाही. कारण शेवटी कोण कोणत्या पक्षांमध्ये जातो, हे आपण सांगू शकत नाही. पण यासंदर्भातली चर्चा मी पण ऐकत आहे, असे म्हटले आहे.
14 Jul 2026 02:32 PM (IST)
ज्या लाडक्या बहिणींना पगार चालू झाला होता, त्यातील काही लाडक्या बहिणी या नोकरीला होत्या. काहींच्या त्रुट्या निघाल्या, तर काही सरकारी नोकरदार होत्या. त्यामुळे पैसे बंद झाले, ही टीका करणे आता एवढेच काम शरद पवार राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंकडे राहिलेला आहे.
14 Jul 2026 02:20 PM (IST)
विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून जालना महापालिकेच्या सभेत भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना नगरसेवकांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळात महापालिकेच्या आयुक्त भर सभेतून निघून गेले. जालना महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौरांनी दहा मिनिटांसाठी तहकूब केली आहे. जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत विपश्यना केंद्राचा मुद्दा न घेतल्यामुळे शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट माइक फेकल्याने गोंधळात अधिकच भर पडली.
14 Jul 2026 02:11 PM (IST)
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिले आहे. यासंदर्भात सिंह यांनी पक्षाला पाठवलेल्या नोटिशीवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मागचे मास्टरमाईंड कोणी महाराष्ट्रातील आहेत का? सुनेत्रा वहिनीचे नेतृत्व कुणाला नको आहे? त्या घरभेद्यांना शोधण्याचे आवाहन त्यांनी पक्षाला केले आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी सच्चिदानंद सिंह यांचा उल्लेख श्वान म्हणून केला असून, त्यांना कोण पळतो आहे, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे ते म्हटले आहे.
14 Jul 2026 02:00 PM (IST)
बहुतांश भारतीय आजही सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोलण्यास कचरतात. या विषयाला बंद खोलीतील विषय मानले जाते. परंतु, आता काळानुसार विचार बदलण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, देशभरातील शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सरकारला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळताच देशभरातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल.
14 Jul 2026 01:55 PM (IST)
सातारा जिल्ह्यातील सहकारांमधील सर्वात महत्त्वपूर्ण व अग्रगण्य असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, सोसायटी मतदार संघासाठी प्रथम स्तरावर सोसायटी मतदारांसाठी ठराव घेतले जातात. ही ठराव प्रक्रिया 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाची आहे. बँकेच्या निवडणुकीच्या या पूर्व तयारीने सोसायट्यांचे ठराव घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले असून, यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
14 Jul 2026 01:50 PM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अचानक दिल्ली गाठली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत आगामी मंत्रिमंडळ विस्तारासह विविध राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
14 Jul 2026 01:45 PM (IST)
झी मराठीवरील ‘कमळी’ मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. कमळी पुन्हा अन्नपूर्णा हाऊसमध्ये परतली असून तिचा आणि कामिनीचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दुसरीकडे, साई भंडाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कमळी आणि सरोज पुन्हा समोरासमोर येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरोजवर झालेल्या गोळीबारानंतर तिच्या पात्राचं पुढे काय होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना, सरोजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री योगिनी चौकने या संपूर्ण ट्रॅकबाबतचा अनुभव शेअर केला आहे.
14 Jul 2026 01:40 PM (IST)
आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिड़ला यांनी रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी खेळली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीने शेल ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट B.V. विकत घेतले आहे. त्यांनी सुमारे $1.8 बिलियन म्हणजेच ₹ 17,200 कोटींमध्ये Sprng एनर्जी विकत घेण्यासाठी करार केला आहे. हा करार देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक अक्षय ऊर्जा प्लॅटफॉर्मपैकी एक तयार करण्याचा मार्ग मोकळा करेल.
14 Jul 2026 01:35 PM (IST)
नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी दररोज विशेष तपासणी मोहीम राबविली जात आहे. मात्र, अशाच एका मोहिमे दरम्यान छत्रपती संमभाजीनगर शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या क्रांतीचौक सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून वसुली केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
14 Jul 2026 01:30 PM (IST)
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या तेल टँकर्सवर इराणने हल्ला केला असून यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यावर भारताने इराणविरोधी कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेला तीव्र विरोध करत भारताने इराणच्या उपराजदूताला तातडीने पाचारणकेले. व्यापारी जहाजांवरील हल्ला अत्यंत गंभीर असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
14 Jul 2026 01:25 PM (IST)
राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा
केली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. विशेष म्हणजे, यापुर्वी कर्जमाफीच्या लाभ घेतलेल्या काही पात्र
शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरुवातीला जूनअखेरपर्यंत कर्जमाफी लागू होईल, अशी चर्चा होती. त्यानंतर जुलैच्या पाहिल्या आठवड्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र विविध प्रशासकीय कारणांमुळे हा निर्णय पुन्हा पुढे ढकलला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून सरकारकडून स्पष्ट तारीख जाहीर होण्याची मागणी होत आहे.
14 Jul 2026 01:19 PM (IST)
दिवंगत बाबा फर्जनच्या मिटमिटा येथील फार्महाऊसमधून जप्त झालेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या रोख रकमेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. रोहिल्ला गल्लीतील जुन्या घराची झाडाझडती, मुलगा फिरदौस फर्जन दोरडी व निकटवर्तीयांची चौकशी, तसेच प्राप्तिकर विभागाला पाठविलेले पत्र यामुळे तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. निवडणुकांतील आर्थिक व्यवहार आणि कामगार संघटनांमधील मध्यस्थीतून बाबा फर्जनने मोठी संपत्ती उभी केल्याच्या दिशेने तपास सुरू आहे.
14 Jul 2026 01:10 PM (IST)
नाशिकमधील प्रसिद्ध भावली धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक कुटुंबासाठी सहलीचे रूपांतर थरारक अनुभवात झाले. महिलेला छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या काही तरुणांनी कुटुंबाचा तब्बल चार ठिकाणी पाठलाग करत गाडीची तोडफोड केली, दगड-रॉडने जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे. जीव वाचवण्यासाठी या कुटुंबाला टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पळ काढावा लागल्याचा धक्कादायक खुलासा कुटुंबांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
14 Jul 2026 01:02 PM (IST)
नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी दररोज विशेष तपासणी मोहीम राबविली जात आहे. मात्र, अशाच एका मोहिमे दरम्यान छत्रपती संमभाजीनगर शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या क्रांतीचौक सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून वसुली केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
14 Jul 2026 12:48 PM (IST)
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने असा एकही विभाग अथवा क्षेत्र सोडले नाही जेथे भ्रष्टाचार केला नाही. ‘जाऊ तिथे खाऊ’ या म्हणीप्रमाणे केवळ भ्रष्टाचारच केला आहे. राम मंदिरातील भक्तांच्या देणगीवर दरोडा टाकून भाजपा आरएसएस वाल्यांचे पोट भरले नाही म्हणून की काय त्यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेवरही दरोडा टाकला आहे. सत्तेतील सावत्र भावांनी बहिणींनाही सोडले नाही. हे सरकार आहे का दरोडेखोरांची टोळी? असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
14 Jul 2026 12:36 PM (IST)
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत जबरी चोरी, लूटमार, घरफोडी आणि सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘दुधानी टोळी’चा (शिकलकरी गँग) ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी (१२ जुलै) जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे या आंतरराज्यीय टोळीतील ६ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्टल (गावठी कट्टा), कटावणी, कटर, पान्हे आणि चोरीची बोलेरो गाडी यांसह गुन्ह्यासाठी लागणारे विविध घातक साहित्य जप्त केले आहे.
14 Jul 2026 12:24 PM (IST)
मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. विशेषतः आंदर मावळ भागात अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची सविस्तर पाहणी केली आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
14 Jul 2026 12:12 PM (IST)
पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या तरुणाला जुन्या वादातून सासरच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मेव्हण्याने हातातील लायटरने नाकावर वार केल्याने जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अकबर खान, अकबर युसूफ खान आणि मोईन अकबर खान (सर्व रा. संपन्न हाइट्स, मिठानगर, कोंढवा) यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रिझवान राजअहमद शेख (वय २६, रा. महविया हाइट्स, मिठानगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना ११ जुलै रोजी रात्री सव्वा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मिठानगर येथील संपन्न हाइट्स इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली आहे.
14 Jul 2026 12:00 PM (IST)
व्हिएलतनाम येथे फु क्वोक बेटाजवळ झालेल्या भीषण बोट दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भारतीयांचे पार्थिव विमानातून मुंबई येथे आणण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर पार्थिव आल्यानंतर राज्य सरकारच्या सन्मवयाने ते त्यांच्या मूळ गावी पोहोचलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. हनोईतील भारतीय दूतावासाने एक्सवरुन याची माहिती दिली.
14 Jul 2026 11:50 AM (IST)
पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात झालेल्या दुमजली इमारत दुर्घटनेप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनेच्या चार दिवसांनंतर पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा कार्यभार काढून घेतला आहे. संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्या भूमिकेचाही प्रथमदर्शनी तपास सुरू असून तपासाच्या निष्कर्षांनुसार त्यांच्याविरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
14 Jul 2026 11:40 AM (IST)
बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळांतील ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे त्यांना एसआयआर कामासाठी शाळेतून पूर्ण वेळ कार्यमुक्त करा तसेच निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांकडून नियुक्त शिक्षकांना एफ आर आय दाखल करण्याबाबत येणाऱ्या सततच्या धमक्या आणि या शिक्षकांशी केल्याजाणाऱ्या अयोग्य वर्तनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका शिक्षक सभेने पालिका शिक्षण उपायुक्त डॉक्टर प्राची जांभेकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
14 Jul 2026 11:30 AM (IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी २०२६ री-एग्जामची ओएमआर शीट (OMR Sheet) आणि रेकॉर्ड केलेले रिस्पॉन्स अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहेत. एनटीएने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे. २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या नीट परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी एनटीएने त्यांच्या ओएमआर उत्तरांना आव्हान देण्याची सुविधा सुरू केली आहे.
14 Jul 2026 11:20 AM (IST)
पुण्यातील मांजरी परिसरातील सराफी पेढीत शेजारच्या खोलीतून भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी 35 तोळे सोने आणि सव्वा किलो चांदीची धाडसी चोरी केली. गॅसकटरने लॉकर फोडून आरोपी फरार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार रखवालदारासह आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.






