सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोविड आणि त्यांनतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सुमारे एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सांगली जिल्हा परिषदेची (Sangli Zilla Parishad) आरक्षण सोडत पार पडली. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण आणि नागरिकांच्या यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. चिठ्यांच्या सोडती रितेश चितरुक या लहान विद्यार्थाच्या हस्ते काढण्यात आल्या.
आरक्षण सोडतीमध्ये अनेक मत्ताबर नेत्यांना धक्का बसला असून, नव्याने तरुण चेहऱ्याना संधी मिळणार आहे. एकूण ६८ जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये एकूण २१ मतदार संघ सर्वसाधारण महिलांना आरक्षित करण्यात आले तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलामध्ये नऊ महिलांना तर अनुसूचित जातीमधून चार महिलांना असे एकूण ६८ गटांपैकी ३४ गटात महिलांना संधी मिळणार आहे.
२ ऑगस्टपर्यंत हरकत घेण्याची मुदत
आरक्षण सोडतीनंतर आता भौगोलिक आक्षेप घेता येणार नाहीत. मात्र, पडलेल्या आरक्षण सोडतीबाबत काही आक्षेप असतील तर उद्या (दि.२९) अधिसूचना काढण्यात येईल. त्यांनतर २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत हरकत घेता येणार आहे. जिल्हा परिषद गटाची हरकत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणांची हरकत तालुक्यात तहसील कार्यालयात द्यायची असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पडलेले गटनिहाय आरक्षण असे
एससी ( अनुसूचित जाती)
शेगाव( महिला), देशिंग ( महिला), बोरगाव ( महिला), वांगी ( महिला), बहादूरवाडी , बुधगाव, खरसुंडी, रांजणी
——————————————–
नामाप्र ( ओबीसी ) १८ जागा ( ९ महिला)
माडग्याळ (महिला), बावची ( महिला), कुची ( महिला), चिकूर्डे (महिला), बिळुर ( महिला),करजगी ( महिला), एरंडोली ( महिला), सावंतपुर (महिला),करंजे( महिला),
जाडरबोबलाद, दिघंची , निबंवडे, संख, वाळवा,कवठेपिरान
कोकरूड, वाकुर्डे बु, सावळज.
———————————————
सर्वसाधारण (४२)
सर्वसाधारण महिला ( २१)
आटपाडी, उमदी, भाळवणी, कडेपुर, विसापूर, रे.हरणाक्ष, नर्ले, सांगाव, मालगाव, नांद्रे, क.डिग्रज, हरिपूर, म्हैसाळ (एस), बेडग, डफळापूर, नागेवाडी, मांजर्डे, भिलवडी, कवलापूर, दुधोंडी, लेंगरे
———————————————-
सर्वसाधारण
तडसर, आरग, करगणी, देवराष्ट्रे, चिंचणी, क.एकंद, मणेराजुरी, ढालगाव, कुंडल, अंकळखोप, कासेगाव, वाळेखिंडी, मुचंडी, येळावी, वाटेगाव, कुरळप, प.त.वारून, मांगले, भोसे
यांना बसला धक्का
संग्राम देशमुख, सुहास बाबर, प्राजक्ता कोरे, अरुण बालटे, जितेंद्र पाटील, सुरेंद्र वाळवेकर, अरुण राजमाने, शिवाजी डोंगरे, प्रमोद शेंडगे, सुषमा नायकवडी, जगन्नाथ नायकवडी
यांना मिळणार पुन्हा संधी
तामनगौडा रवी पाटील, शरद लाड, ब्रह्मानंद पडळकर, संजीवकुमार पाटील, डी.के.पाटील, आशा सुनील पाटील, नितीन नवले
हे मतदारसंघ पुन्हा खुले पडले
कुंडल, कुरळप, अंकलखोप, मणेराजुरी, चिंचणी, बागणी
संभाव्य चेहरे
देवराज पाटील ( कासेगाव), शरद लाड ( कुंडल) , रणजित पाटील, सम्राट महाडिक ( पेठ), ब्रह्मनंद पडळकर ( निंबवडे), तामनगौडा रवी पाटील ( जाडरबोबलाद), अमित पाटील, उमेश पाटील ( येळावी), विराज नाईक ( मांगले) , संभाजी कचरे, वैभव शिंदे ( बागणी), रणधीर नाईक ( प.त वारूण), अप्पाराया बिरादार ( मुचंडी)
नव्या मतदारसंघात पडले हे आरक्षण
एकूण आठ नवीन मतदार संघ निर्माण झाले आहेत, तर पाच गटांची नावे बदलण्यात आली आहेत. त्यामध्ये खालील प्रमाणे आरक्षण पडले आहे. निंबवडे (नामाप्र), कवठे-एकंद (नामाप्र), नांद्रे (सर्वसाधारण महिला), सांगाव (सर्वसाधारण महिला), करंजे (नामाप्र महिला), सावंतपुर (नामाप्र महिला), बहाद्दूरवाडी (अनुसूचित जाती) , कुरळप ( सर्वसाधारण) , वाळेखिंडी ( सर्वसाधारण), करजगी (नामाप्र महिला) माडग्याळ ( नामाप्र महिला), हरिपूर ( सर्वसाधारण महिला), नर्ले (सर्वसाधारण).