मुंबई – दुपारी 12 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान, शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह
मुंबई – विधन परिषदेच्या 2 पदवीधर व 3 शिक्षक अशा एकूण 5 मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या निवडणुकीत प्रथमच भाजप व महाविकास आघाडीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मतदान केंद्रांची पाहणी
मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले आहे. शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उत्साहात रांगा लावून मतदान करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली.
सकाळी 8 वाजता मतदानाला सुरूवात
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 22 उमेदवार निवडणूक लढवित आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांच्यातच लढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरूवात झाली. नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांच्यातच लढत असल्याचे चित्र आहे. आज एकमेकांना शुभेच्छा देत नागो गाणार, सुधाकर अडबाले यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.