शिक्रापूर : कारेगाव (ता. शिरूर) येथील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करुन युवतीला शिवीगाळ केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अल्ताफ सलीम मुलाणी याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कारेगाव (ता. शिरूर) येथील पीडित युवतीची ओळख अल्ताफ मुलाणी याच्यासोबत झाली होती, त्यांनतर अल्ताफ याने युवतीशी ओळख वाढवून युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला त्यानंतर त्याने युवतीला फोनवर शिवीगाळ, दमदाटी देखील केली मात्र युवती लग्नाबाबत विचारू लागली असता अल्ताफ टाळाटाळ करू लागल्याने पीडित युवतीने घडलेल्या घटनेबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन पोलीस स्टेशन येथे फिर्यादी असल्याने रांजणगाव पोलिसांनी अल्ताफ सलीम मुलाणी सध्या रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. फडतरी ता. माळशिरस जि. सोलापूर याचे विरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करत आहे.






