सौजन्य - सोशल मिडीया
पंढरपूर/नवनाथ खिलारे : विधानसभा निवडणुकीसाठी भरलेले अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. अशातचं आता माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची रविवारी मतदार संघातील पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा पार पडली. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हलगीच्या कडकडाटासह फटाक्याच्या आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात अभिजीत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या सभेस संबोधित करताना अनेक वकत्यांनी बोलतांना सांगितले की, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारा महाराष्ट्रातील ऐकमेव नेता म्हणजे अभिजीत आबा पाटील आहेत. कोरोना महामारीच्या संकटात त्यांनी त्यांचे आर्थिक नुकसान करून ऑक्सिजन प्लांट तयार केला होते, डीव्हीपी मॉल बंद करून कोविड हॉस्पिटल चालू केले होते. यामुळे त्यांना माणसातील देवमाणुस म्हणून ओळखले जाते असे उद्गार अनेकांनी यावेळी काढले.
विद्यमान आमदारांनी काय केलं? – पाटील
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील सभेत अभिजीत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की, विद्यमान आमदारांनी माढ्यात कोणताही विकास केला नाही. महापुरुषांचे पुतळे ही उभा करू शकले नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाला दर दिला नाही. करकंब मध्ये नगरपरिषद होऊ दिली नाही. माढ्याला पिण्याचे पाणी सुद्धा ते देऊ शकले नाहीत. यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे. सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास केला. मात्र इथले हजारो तरुण बेरोजगार कसे असा प्रश्न उपस्थित करत या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर मला संधी द्या. एमआयडीसीचा प्रश्न एका वर्षात पूर्ण करून दाखवतो. या माध्यमातून या भागातील वीस हजार तरुणांच्या हाताला काम देण्याची भूमिका पार पाडेन. मी आमदार झाल्यानंतर विधानसभेतील पहिल्या भाषणात मराठा आरक्षण याविषयी प्रश्न उपस्थित करीन, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिला.
हे सुद्धा वाचा : पुरंदरमध्ये होणार तिरंगी लढत; शिवतारेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठबळ?
यावेळी अभिजीत पाटील यांना देवडे येथील मराठा उपोषणकर्ते संतोष झांबरे, जिजाबा तुकाराम पाटील, कल्याण काळे गटाचे शरद शिंदे, परिचारक गटाचे ज्ञानेश्वर गंगाधर बनसोडे, नांदोरे येथील मोतीलाल आप्पा भिंगारे, तरटगावचे परिचारक गटाचे भारत कांबळे, नांदोरे येथील परिचारक गटाचे रविकांत माने या सर्वांनी अभिजीत पाटील यांना आमदार करण्यासाठी आपल्या सहकार्यांनसोबत त्यांच्या गटात प्रवेश करून पाठिंबा दिला. दिवसेंदिवस अभिजीत पाटील यांना माढा मतदारसंघातून तसेच मतदार संघातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमधून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांच्या सभांना नागरिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत आहेत.