लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) लोणावळा (Lonawala) येथे घाटात अपघात (Accident) झाल्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. तसेच, गणेशोत्सवामुळे (Ganeshotsav) मुंबईहून (Mumbai) अनेक लोक गावी जात असल्यामुळेही वाहनांची गर्दी अधिक दिसत आहे.
लोणावळ्याजवळील बोरघाटातील अमृतांजन पूलाजवळ हा अपघात झाल्यामुळे वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये मोठ्या रांगा लागल्या असून सलग सुट्ट्या, गणेशोत्सवामुळे पर्यटक आणि कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला आहे. यासंदर्भात नुकसानीची माहिती समोर आली नसून किरकोळ अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.