स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघ भाजपची मदत करणार? (फोटो- टीम नवराष्ट्र)
Local Body Election: राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला संपूर्ण असे बहुमत दिले आहे. महाविकास आघाडीला केवळ 50 जागाच जिंकता आल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. विधानसभेत भाजपने मोठे यश प्राप्त केले आहे. भाजपच्या यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा हात असल्याचे म्हटले जाते. आता विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजपसाठी संघ मैदानात उतरण्याची शक्यता आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
विधानसभा निवडणुकीत भाजपने एकट्याने 132 जागा जिंकल्या आहेत. इतक्या जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या या मोठ्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते. लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर संघाने विधानसभेत भाजपसाठी अत्यंत ग्राऊंड लेवलला जाऊन काम केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे भाजपला राज्यात मोठे यश मिळाले अशी चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संघ भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आतापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी सज्ज झाल्याचे म्हटले जाते. या निवडणुकांबाबत संघ आणि भाजपच्या बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकांसाठी सूक्ष्म नियोजन संघातर्फे केले जाऊ शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एकट्याने लढण्याची शक्यता आहे. भाजपला संघाची मदत झाल्यास पुनः एकदा भाजप या निवडणुकीत मोठे यश प्राप्त कण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडून मोठा पराभव झालेली महविकास आघाडी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत तयारीला लागली आहे. भाजपचे मुंबई महानगरपालिका जिंकणीचे प्रयत्न असणार आहेत. गेली 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) गटाची सत्ता आहे. त्यामुळे सत्ताबदल करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आघाडीच्या सलंग्न संघटनानांशी समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची संघाच्या संघटनानांशी बैठक झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपला या निवडणुकांमध्ये मोठे यश प्राप्त करता येऊ शकते.
संघाचा ‘हा’ मास्टरप्लॅन अन् भाजपचा महाराष्ट्रात ऐतिहासिक रेकॉर्ड
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आखलेल्या नियोजनबद्ध आखणीमुळे भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळवता आले असे म्हटले जात आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 133 जागा भाजपने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिल्याने अनेकांनी पराभवाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. तर काही जण ईव्हीएम मशीनवर टीका करताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपने संघाची मदत नको असल्याचा किंवा आता भाजप एवढा मोठा पक्ष झाला आहे की संघाची गरज नाही अशा प्रकारची विधाने केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदणात उतरला नसल्याचे म्हटले जाते. मात्र त्यानंतर विधानसभेसाठी भाजपने सावध पवित्रा घेत संघाकडे मदत मागितली आणि आज भाजपला राज्यात मोठे यश मिळाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने लहान-मोठ्या बैठका घेतल्या. त्या भागतील सामाजिक, राजकीय परिस्थिती जाणून घेतली. जास्तीत जास्त कुटुंबाशी संपर्क साधला. राष्ट्रहित, हिंदुत्व, सुशासन याबाबत नागरिकांना आश्वस्त करण्यात संघाला यश आले. लोकांमध्ये संघाबद्दल असलेला विश्वासाचा फायदा झाल्याचे दिसून आले. ठेत भाजपला मतदान करावे अशा प्रकारे प्रचार न करता राष्ट्रहित जपणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून विश्वासहर्ता निर्माण करण्याचा प्रयत्न संघाने केला. संघाच्या या सूक्ष्म प्लॅनिंगमुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठा विजय मिळवता आला.