मुंबई – शिवसेना (Shivsena) व शिंदे गटाचा (Shinde group) दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) राज्यात राजकीय वातावरण तापल्याचे सर्वांनी पाहिले. आता शिंदे गटातील दसरा मेळावा व उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) शिवसेनेचा दसरा मेळाव्याला कुठं लोकं जमली होती. गर्दी कुठे होती, यावर चर्चा रंगत असून, दोन्ही दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया येत असताना, दोन्हीकडून ऐकमेकांवर टिकाही केली जात आहे. दरम्यान, आता विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) खास आपल्या स्टाईलमध्ये शिंदे गटावर टिका केली आहे.
[read_also content=”शिंदे गटाने न्यायालयात सादर केली कागदपत्रे, ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी उद्याची मुदत https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-group-paper-submit-to-court-shivsena-time-for-tomorrow-333615.html”]
दरम्यान, विरोधीपक्षनेते अजित पवार एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मविआ सरकार असताना आम्ही विचाराधारा बाजूला ठेवून मार्ग काढला. आम्ही आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला. कोरोनाकाळात सर्वांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं. पाऊस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला संबंध आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही असं म्हणत अजित पवारांनी शिंदे गटावर टिकास्त्र सोडले. मुख्यमंत्री शिदेंच्या भाषणावेळी लोकं उठून निघून गेली, शिंदेंनी मोठ्या प्रमाणात बसेस बुक केल्यानं सामान्याची गैरसोय झाली. तुमच्या भाषणातून लोकं उठून गेली, मग ती स्वत: कशी आली? दहा कोटी रुपये कुठून आले? असं अनेक प्रश्न अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारत, खोके एकदम ओके… असं म्हणत अजित पवारांची शिंदे गटावर टिका केली.