Photo Credi-Social media
मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीत जागावाटपाच्या चर्चा अद्याप सुरू असताना अजित पवार यांच्या गटाने आपल्या 25 उमेदवारांची यादी फायनल केली आहे. अजित पवार हे स्वत: बारामतीतूनच निव़णुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.
महाय़ुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले २५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. महायुतीची चर्चा सुरु आहे, पण काही निवडक जागांवर आतापासून तयारी सुरू करावी आणि कामाला लागावे, या दृष्टीने अजित पवार यांच्या गटाने आपला पहिला डाव टाकला आहे.अजित पवार हे स्वत: बारामतीतून लढणार असल्याचेही जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा: गोंदियामध्ये भाजपला ‘दे धक्का’; माजी आमदारांची कॉंग्रेसमध्ये होणार घरवापसी
बारामती : अजित पवार, उदगीर : संजय बनसोड, आंबेगाव : दिलीप वळसे-पाटिल, दिंडोरी : नरहरि झीरवळ, येवला : छगन भुजबळ पुसद : इंद्रनील नाइक, वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटिल, रायगड : अदिति तटकरे, कळवण : नितिन पवार, मावळ : सुनील शेळके अमळनेर : अनिल पाटिल, अहेरी : धर्मराव बाबा अत्राम, कागल : हसन मुश्रीफ, खेड : दिलीप मोहिते-पाटिल, अहमदनगर : संग्राम जगताप, जुन्नर : अतुल बेनके, वडगाव शेरी : सुनील टिंगरे
हेही वाचा: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, चेतन पाटीलचाही वाढला जेल मुक्काम