संग्रहित फोटो
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (दादा), प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील (नाना), माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने रणांगणात उतरणार आहे. तासगावात राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करून विकासाचा नवा अध्याय लिहायचा आहे, असे म्हणत पाटील यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. यावेळी शहराध्यक्ष दिनेश पवार, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
माजी मंत्री अजितराव घोरपडेंकडे धुरा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्यासमोर अजितराव घोरपडे यांचे थेट आव्हान उभे राहणार का, याकडे तासगावकरांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.






