Photo Credit -Social Media (मोहोळ मतदारसंघात रिद्धी कदम यांना उमेदवारी)
अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे शरद पवार यांच्या गटात जोरदार इमकमिंग सुरू असताना अमरावतीतील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार केल्याने शरद पवार गटाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहेत. विधानसभेपूर्वी अचानक असे राजीनामे दिल्याने शरद पवार गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना पदावरून पायउतार केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असले तरी त्यांच्याकडे प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. यामुळेही राऊत यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
हेही वाचा: महानवमीच्या दिवशी हे मूलांक असणाऱ्या लोकांवर राहील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद
पक्षाने केलेल्या या कारवाईनंतर प्रदीप राऊत यांनी बंडखोरी करत आपल्याला विश्वासात न घेता पदावरून काढले असल्याची प्रतिक्रीया देत नाराजी व्यक्त केली आहेत. तसेच, गेल्या पाच महिन्यांत आम्ही पक्ष संघटना मजबूत केली, संघटनेसाठी काम केले पण कुठलेही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकण्यात आले. हा आपल्या पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अपमान आहे. याबाबत आम्ही लवकरच पक्षश्रेष्ठी शरद पवार यांची भेट घेणार आहोत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ठिक, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असेही प्रदीप राऊत यांनी स्पष्ट केले.






