मुंबई : आगामी पालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर आतापासून भाजपाने (BJP) मोर्चेबांधणी व रणनिती आखली असताना, आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातही भाजपाने माजी नगरसेवक मुरजी पटेल (Murji Patel) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळं इथली “कॉटे की टक्कर” अशी लढत होणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या (Andheri East Bypoll) जागेसाठी तीन नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
[read_also content=”आधी तुमच्या पक्षाची चिंता करा, चित्रा वाघ यांची मविआ व नीलम गोऱ्हेंवर टीका https://www.navarashtra.com/maharashtra/worry-about-your-party-first-chitra-wagha-criticizes-neelam-gorha-and-mva-332374.html”]
दरम्यान, या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना तिकीट दिलं आहे. तर भाजपाने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या जागेवर शिंदे गट निवडणूक लढवणार होता, मात्र त्याआधीच भाजपने कुरघोडी करत आपला उमेदवार जाहीर केलाय, त्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मी तुमच्याशी लवकरच बोलेन, असं मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. लवकरच चर्चा करुन सांगेन, असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत यावर अधिक बोलणं टाळलं.