पुण्यात जीबीएसमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू (फोटो- istockphoto)
GBS Virus: पुण्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जीबीएस आजार मोठ्या प्रमरणात पसरत आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात जीबीएसचे साधारण 150 ते 200 रूग्ण आढळून आले आहेत. नुकतीच बारामतीची असणारी आणि पुण्यात शिकणाऱ्या एका मुलीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे.
जीबीएस आजाराशी झुंज देणाऱ्या एका युवतीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थीनी पुण्यातील सिंहगड परिसरात राहत होती असे समजते आहे. शिकण्यासाठी ती बारामती येथून पुण्याला आल्याचे समोर आले आहे. बारामतीमधून एका युवतीचा जीबीएस आजारांमुळे मृत्यू झाला आहे. बारामतीची ही मुलगी शिक्षणासाठी आपल्या नातेवाईकांकडे पुण्यात राहायला होती.
या विद्यार्थिनीला जीबीएसची लागण झाली होती. तिच्या गेले तीन आठवडे उपचार सुरू होते. या मुलीस जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे शंका आल्याचे तीने याबद्दल तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला पुण्यात उपचारासाठी नेण्यास सांगितले. तिला तातडीने पुण्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर हा त्रास तिला जाणवू लागला होता. गेले तीन आठवडे तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर तिचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील ‘या’ विहीरीमुळे पसरला GBS व्हायरस
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्या 111 वर पोहोचली असून, यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रुग्णांपैकी 80% रुग्ण नांदेड गाव आणि नांदेड सिटी परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील परिसरातील असल्याचे निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या वाढत्या प्रकरणांमुळे लोक खूप घाबरले आहेत. दरम्यान, वाढत्या प्रकरणांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आणि कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, या आजाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, लोकांनी त्यांचे अन्न, विशेषतः चिकन, पूर्णपणे शिजवावे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की या आजाराबाबत कुक्कुटपालनाशी संबंधित चिंता दूर केल्या पाहिजेत आणि कोंबड्यांना मारण्याची गरज नाही. “अलीकडेच खडकवासला धरण परिसरात (पुणे) जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत,” असे ते म्हणाले. काही तज्ञांनी याचा संबंध पाण्याच्या दूषिततेशी जोडला, तर काहींनी हा आजार चिकन खाल्ल्याने झाल्याचे म्हटले. सखोल तपासणीनंतर, असा निष्कर्ष काढण्यात आला की कोंबड्यांना मारण्याची गरज नाही.”
जीबीएस कसा पसरतो?
जीबीएस संसर्ग दूषित पाणी आणि अन्नामुळे होऊ शकतो, विशेषतः ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ या जीवाणूंनी संक्रमित अन्नामुळे. आरोग्य तज्ञांच्या मते, हे बॅक्टेरिया कमी शिजवलेल्या चिकनमध्ये आढळू शकतात, ज्यामुळे हा संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते.