नागपूर : ताडोबा, पेंच, नागझिरा या ठिकाणी पर्यटक येतात तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा पर्यटन विकास झाला पाहिजे. गोसेखुर्द या जागतिक दर्जाच्या धरणातील वॉटर स्पोर्ट्स आणि बोटिंग सर्विस चालू झाल्या तर भंडाऱ्यातील पर्यटनाला चालना मिळेल. तर, येथील पर्यटनातून तरुण मुलांना रोजगार मिळेल, असे प्रतिपपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील १४ पूर्णांक ८० किलोमीटर लांबीचा सहापदरी बायपासच्या ४२१ पूर्णांक ४० कोटी रुपयांचा तरतुदीने बांधला जाणा-या कामाचे भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
[read_also content=”केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन, परिषदेत देशभरातील सुमारे दोन हजार डॉक्टर सहभागी https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/union-minister-nitin-gadkari-inaugurates-three-day-national-online-conference-nraa-248600.html”]
या रस्त्यामुळे वैनगंगा नदी वरच्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील वाहतुक कोंडी थांबणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. नागपूर भंडाराच्या सीमेवर असणाऱ्या अंभोरा येथील केबल स्टेड पूलाचे निरीक्षण त्यांनी केले. या पुलावर व्हुअर गॅलरी, कॅप्सूल लिफ्ट अशा प्रकारच्या सुविधा असतील त्यामुळे गोसेखुर्द धरणातील बॅकवॉटरच्या पर्यटनाला वाव मिळणार आहे. या पुलामुळे नागपूर ते भंडारा – गोंदिया ही वाहतूक सुरळीत होणार आहे. अंभोरा ते भंडारा हे अंतर पार करण्यासाठी लागणारा दीड तासाचा वेळ कमी होऊन आठ ते दहा मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाने जर दोन टेकड्यांना जोडण्याची परवानगी दिली. तर भंडारा नागपूर या जिल्ह्यांना हवेत जोडणारा रोपवे आपण निर्माण करू, असेही गडकरी यांनी सांगितले.
[read_also content=”क्षुल्लक वादातून जिवंत पेटवून ६० वर्षीय वृद्धाची निर्घुण हत्या, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/police-have-arrested-three-persons-in-connection-with-the-brutal-murder-of-a-60-year-old-man-nraa-247176.html”
ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर ते गोंदिया, चंद्रपूर, भंडारा अशा शहरांना ब्रॉडगेज मेट्रोने जोडण्यात असल्याने १४० कोटी किलोमीटर प्रतितास वेग असणाऱ्या रेल्वे गाड्या मुळे भंडाऱ्याला नागपूरवरून अर्ध्या तासात पोचता येईल, असे गडकरी यांनी सांगितले. यासोबतच भंडारा रेल्वे स्टेशनच्या बाजूला जर ‘ड्राय पोर्ट’ साठी जागा करून द्यायला जिल्हा प्रशासन तयार असेल तर भंडार्यातून निर्यात होणाऱ्या बॉईल्ड तांदळाचे आयात निर्यात केंद्र सुद्धा विकास करण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
[read_also content=”मोहता मिल कामगारांचे आगळेवेगळे भिक मांगो आंदोलन, आता तरी मागण्या पूर्ण होतील का ? https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/the-begging-movement-of-mohta-mill-workers-will-the-demands-be-met-now-nraa-248975.html”]
भंडारा ते पवनी रस्त्याच्या बांधकामात वन विभागाचा अडसर येत असू न ज्या जमिनीवर वन विभागाद्वारे डिनोटिफाईट म्हणून नोंदणी आहे, तेथे वन विभागाने अडचण आणली आहे, असे त्यांनी सांगितले. भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले असून हा मार्ग बालाघाट पर्यंत जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, स्थानिक लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच भंडारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.