Photo Credit- Social Media महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं शिर्डीत अधिवेशन
शिर्डी: विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर महायुतीला आता राज्यातील महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (12 जानेवारी) शिर्डीत भाजपचे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आली आहे. या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असून, ते जवळपास 15 हजार भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभेनंतर आता महापालिकांची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप काय रणनीती आखेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार होणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, आणि दुसरा म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळावर यश मिळवण्यासाठी रणनीती आखणे. शिर्डीत होणाऱ्या या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात आयोजित अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी लक्ष्य देण्यात आले होते. त्या रणनीतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठीही अशाच प्रकारच्या नियोजनावर भर देण्याची अपेक्षा आहे. शिर्डीत होणाऱ्या या अधिवेशनाकडे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या उत्साहाने पाहत आहेत.
मी मिनी पाकिस्तानात लढतोय; भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याची तयारी
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशामुळे भाजप आणि त्यांचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. त्यानंतर आता भाजपने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवर केंद्रित केले आहे. उद्यापासून शिर्डीत सुरू होणाऱ्या एक दिवसीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपकडून या निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी केली जाणार आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते या अधिवेशनादरम्यान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेणार आहेत. तसेच, संघटनात्मक विस्तारासाठी नव्या योजना आखण्यात येणार आहेत. गेल्या वेळी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रथम क्रमांक मिळवला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
सदस्य नोंदणी मोहीम आणि संघटनात्मक बांधणी
सध्या भाजपकडून सदस्य नोंदणी मोहीम जोरात सुरू आहे. एका विधानसभा मतदारसंघात 80 ते 90 हजार सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. या माध्यमातून पक्ष संघटनेची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे:
या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजप स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आपली रणनिती ठरवेल आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज करण्यावर भर देईल.